खबरदारीच करेल आगीपासून बचाव !

fire
firesakal
Summary

उन्हाच्या तडाख्यासोबत आणि वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे शहर परिसरात आगीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. रात्री थंडीपासून बचावासाठी पेटविली जाणारी शेकोटी आणि माळरानावर सिगारेट पिऊन जळते थोटूक टाकण्याचे प्रकार याला कारणीभूत ठरत आहेत. मागील ४५ दिवसांत अशा प्रकारच्या आगीच्या ३२ घटना घडल्या आहेत. अशा आगीच्या दुर्घटना कमी करायचा असेल तर खबरदारी हाच उपाय असल्याचे अग्निशामक दलाचे म्हणणे आहे.

गेल्या पंधरा दिवसांत माळरानासह जंगलाला आग लागण्याच्या दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. ३१ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाजवळ लष्कराच्या तुर्कमट्टीतील जंगलाला आग लागली. तर राजहंसगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या माळरानाला आग लागल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी घडली. यासह केदनूरमध्ये गवत गंजी घेऊन जाणाऱ्या संपूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीला आग लागण्याची घटना नुकतीच घडली आहे. ग्रामीण भागात सध्या जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून वाळलेले गवत कापणी करून साठवले जात आहे. मात्र, अशा गंजीनाच आग लागल्याच्या घटना घडत आहेत.

आगीच्या घटनांचे मूळ कारण

  • रस्त्याकडेला जमणारा पालापाचोळा आणि कचरा जाळणे

  • थंडीपासून बचावासाठी शेकोटी पेटवून तशीच ठेवणे

  • माळरानावर सिगारेट ओढून जळते थोटूक तेथेच टाकून देणे

  • गवत कापणीनंतर पुन्हा नवीन गवत येण्यासाठी शिल्लक गवताला आग लावणे

  • आगीची ठिणगी वाऱ्यासह उडून जाऊन दुसऱ्या ठिकाणी आग लागणे

खबरदारी अन् उपाय

  • शेकोटी पेटविल्यानंतर जाताना ती विझवावी.

  • अर्धवट जळालेली सिगारेट वा विडी कुठेही टाकू नये. ती आटोक्यात आणल्याची खातरी करावी.

  • कचरा पेटविल्यानंतर तो जळेपर्यंत त्याच ठिकाणी थांबून पाण्याने आग आटोक्यात आणणे.

  • गवत ट्रॉलीतून नेताना वीजवाहिन्यांचा स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी.

  • गंजी रचताना दोन गंज्यांमध्ये किमान सहा फूट अंतर ठेवावे.

  • गंजीच्या चारी बाजूने चर खोदावी जेणेकरून आग लागली तर ती पसरणार नाही.

  • गंजीजवळील जागेतून वीजवाहिन्या गेलेल्या नसाव्यात.

  • गंजीच्या आजूबाजूला चुलीतील राख वा इतर आगीशी संबंधित कोणत्याही वस्तू टाकू नयेत.

दोन वर्षांतील आगीच्या घटना

वर्ष जानेवारी फेब्रुवारी

२०२१ ३० २२

२०२२ २७ ५

(१४ फेब्रुवारीपर्यंत)

‘वारा अधिक असून माळरानावर गवत वाळलेले असल्याने आगीच्या घटना घडत आहेत. त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक ठरले आहे. उंचावरील तसेच जंगल परिसरात आग लागल्यास ती आटोक्यात आणणे अवघड असते. अशा ठिकाणी शक्यतो ज्वलनशील वस्तू नेणे टाळावे. गवताची गंजी रचताना सुरक्षित अंतर राखावे.’

- व्ही. एस. टक्केकर, शहर ठाणाधिकारी, अग्निशामक दल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com