
बेळगाव : जमीन खरेदी विक्री कायद्याचे उल्लंघन
बेळगाव : जमीन खरेदी विक्री कायद्याचे उल्लंघन करत २० एकर २८ गुंठे जमीन भलत्याच्याच नावावर केल्याच्या आरोपाखाली बेळगाव व खानापूर उपनोंदणी अधिकाऱ्यासह खानापूरच्या तत्कालीन तहसीलदारासह १६ जणांविरुद्ध विरोधात मार्केट पोलीस ठाण्यात गुरुवार (ता.३१) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नारायण गंगाराम लाड (वय ७४, रा. रामदेव गल्ली वडगाव) यांनी न्यायालयात खाजगी खटला दाखल केला होता. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याची सूचना केली.
त्यानुसार पोलिसांनी लक्ष्मण मल्लाप्पा नाईक, बळवंत बुदाप्पा नाईक (दोघेही रा. हब्बानट्टी ता. खानापूर) महेश कृष्णा नावेकर (रा. मराठा मंदिरनजीक टिळकवाडी), नागेश व्ही. मेत्री आंबेडकर गल्ली येळ्ळूर), राजाभाऊ एल. मादर (रा. आमटे ता. खानापूर), आनंद डी. पाटील (रा. वडगाव), संतोष काळे (रा. टिळकवाडी), विष्णुतीर्थ गुब्बी, उपनोंदणी अधिकारी बेळगाव), दीपक देसाई, उपनोंदणी अधिकारी खानापूर, रेशमा तलिकोटी तहसीलदार खानापूर, सदाशिव शेखर बेनाळी, (रा. महावीरनगर चिकोडी), मारुती कृष्णा हुलकडली रा. रामलिंगगल्ली नावगे), रामलिंग नारायण कार्लेकर (रा.गुरव गल्ली संती बस्तवाड), किरण नारायण पाटील (रा. पाटील गल्ली धामणे), पुरुषोत्तम (रा. नावगे), रघुनाथ रत्नाप्पा साळुंखे (रा. मारीहाळ) यांच्यावर गुन्हा दाखल घेतला आहे. खानापूर तालुक्यातील आमटे गावातील सर्वे नंबर २७ मधील २० एकर २८ गुंठे जमीन लक्ष्मण आणि बळवंत नाईक यांना १९७६ च्या लँड ट्रिब्यूनल मध्ये मंजूर झाली होती.
त्यानी महेश होनगेकर यांना वटमुखत्यार पत्र दिले होते. होनगेकरने पफिर्यादी नारायण यांना संपर्क साधला व तुम्हाला जमीन खरेदी देतो असे सांगून त्यांच्याकडून ८० लाख रुपये घेतले. होनगेकरने फिर्यादीसह आरोपी लक्ष्मण आणि बळवंत यांना सोबत घेऊन २०१६ मध्ये आईजीपीए करून जीपीए रद्द करून घेतले. त्यानंतर वरील सर्व आरोपीनी संगणमत करून स्वतःच्या फायद्यासाठी होनगेकर याने लक्ष्मण आणि बळवंत यांच्याकडून बेळगाव नोंदणी मध्ये डिडऑफ सेल करून घेतले. नंतर सब रजिस्टर विष्णुतीर्थ गुब्बी, खानापूरचे सबरजिस्टर दीपक देसाई आणि तत्कालीन तहसीलदार रेशमा तलिकोटी यांनी सदर जमिनीचा पी टी सी एल आणि कर्नाटक लँड अॅक्ट उल्लंघन करत महेश होनगेकर याच्या नावावर जमीन केली. त्यानंतर आरोपीने सदाशिव माळी चिकोडी यांना जमिनींची विक्री केल्याचा आरोप नारायण लाड यांनी तक्रारीत केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Violation Land Purchase And Sale Law Fraud Case Filed Against Persons Including Tehsildar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..