esakal | वाहतूक नियमांचे उल्लंघन सांगलीकरांना पडले ७८ लाखांना
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic-Police

वाहतूक नियमांचे उल्लंघन सांगलीकरांना पडले ७८ लाखांना

sakal_logo
By
शैलेश पेटकर-सकाळ वृत्तसेवा

सांगली : बेदकार वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालण्यासह वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सांगलीकर वाहनचालकांवर सीसीटीव्हींचा वॉच आहे. महापालिका क्षेत्रात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यामातून २८ हजार ४०२ वाहनांवर कारवाई झाली. त्यातून ७८ लाख ३२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मोबाईल डिव्हाईच्या मध्यमातून ई-चलनाद्वारे एक लाख ७१ हजार २९७ जणांवर कारवाई करण्यात आली. सुमारे चार कोटी ५३ लाख ४८ हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. गेल्या नऊ महिन्यांतील ही आकडेवारी आहे. पोलिस दलाकडून ही मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे.

बेदकार वाहन चालवणे, मोबाईल बोलत वाहन चालवणे, सिग्नल तोडणे यासह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध ठिकाणी पोलिस दलाकडून सीसीटीव्ही लावण्यात आले. महापालिका क्षेत्रातील सर्वच मुख्य रस्त्यांवर ही यंत्रणा कार्यान्वित झाली. यात १२ अत्याधुनिक कॅमेरांद्वारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई केली जाते. सांगली-मिरज आणि कुपवाड शहरांत ही कारवाई सुरू आहे. आत्तापर्यंत २८ हजार ४०२ वाहनचालकांवर ही कारवाई झाली. त्यांच्याकडून ७८ लाखांचा दंड करण्यात आला.

हेही वाचा: मुख्यमंत्रीपद राखणार?; ममता बॅनर्जी सुरक्षित मतदारसंघातून लढवणार पोटनिवडणूक

दरम्यान, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मोबाईल डिव्हाईसद्वारे ‘ई-चलन’द्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. या नऊ महिन्यांत एक लाख ७१ हजार कारवाई करण्यात आल्या असून ४ कोटींवर दंड ठोठावण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात वाहतुकीच्या नियमांचे पालन होताना दिसत असल्याचे चित्र आहे.

loading image
go to top