esakal | मुख्यमंत्रीपद राखणार?; ममता बॅनर्जी सुरक्षित मतदारसंघातून लढवणार पोटनिवडणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee

मुख्यमंत्रीपद राखणार?; ममतांनी निवडला सुरक्षित मतदारसंघ

sakal_logo
By
अमित उजागरे

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दैदिप्यमान यश मिळवूनही स्वतः नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आता भवानीपूर येथून पोटनिवडणूक लढणार आहेत. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी त्यांना निवडून येणं गरजेचं असल्यानं त्या पुन्हा निवडणूक रिंगणार उतरल्या आहेत. ३० सप्टेंबर रोजी ही पोटनिवडणूक होणार आहे.

पश्चिम बंगालचे कृषीमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोभानदेब चटोपाध्याय यांनी मे महिन्यात आपला आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांची भवानीपूरची जागा रिक्त झाली होती. चटोपाध्याय यांनी विधानसभा अध्यक्ष बिमन बंडोपाध्याय यांच्याकडे पक्षाचे वरिष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांच्या उपस्थितीत आपला राजीनामा सोपवला होता.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला विशेष अधिकार दिलेत का? चित्रा वाघ यांचा सवाल

भवानीपूरच्या जागेसह जंगीपूर आणि समसेरगंज या जागांवरही पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये भवानीपूरमधून ममता बॅनर्जी तर जंगीपूरमधून तृणमूलचे जाकीर हुसैन आणि समसेरगंज येथून अमिरुल इस्लाम हे निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा: शिक्षणाची ओढ! होडीत भरली 'पाठशाला'; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

पश्चिम बंगालमधील समसेरगंज आणि जंगीरपूर आणि ओडिशामधील पिपली या जागांवर विविध कारणांमुळे निवडणूक होऊ शकली नव्हती. यामध्ये उमेदवारांचा निवडणूक प्रचारादरम्यान मृत्यू झाला होता.

loading image
go to top