यंदाच्या गळीत हंगामासाठी विराज केन ऍग्रो सज्ज : देविखिंडीत कारखान्याकडून ऊसतोडीस प्रारंभ 

सचिन निकम 
Monday, 31 August 2020

लेंगरे (सांगली)-  यंदाच्या गळीत हंगामातील ऊसाच्या तोडीसाठी विराज केन  ऍग्रो सज्ज झाला असुन कारखान्याची या हंगामातील पहिली टोळी देविखिंडीत दाखल झाली आहे.ऊसतोडीस प्रारंभ केला आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत विराजने यंदाचा गाळप हंगाम इतर कारखान्यापेक्षा अगोदर सुरु केल्यामुळे ऊसाला तोड मिळू लागल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.चालू वर्षातील गळीत पुर्णक्षमतेने करणार असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक वैभव पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या या महामारीच्या काळात ऊस वेळेत तुटेल की अशी शाश्वती नसताना विराजने ऊसतोडीस सुरुवात केल्याने शेतकरी आनंदीत आहे. विराज केन्सच्या चालू वर्षातील गळीत हंगामाची दिमाखात सुरुवात झाली आहे.या गळीत हंगामात विराज केन्स हे युनिट पूर्ण क्षमतेने चालवणार असून या हंगामात 1.25 लक्ष मेट्रिक टन एवढे गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याकडून ठेवण्यात आले आहे.यासाठी लागणारी सर्व ऊस तोड यंत्रणा सज्ज ठेवल्याने ऊसतोडीस वेळेत प्रारंभ झाला आहे.

तरी परिसरातील शेतकरी व सभासद यांनी आपला ऊस हा कारखान्याला देऊन लाभ घ्यावा असे आवाहन केले. त्याचबरोबर उसाला रास्त भाव व करेक्ट वजन देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यार असल्याचे सांगितले होते.त्यामुळे कोरोनाच्या आपत्ती काळात ऊस उत्पादक शेतकर्याना आधार दिल्यामुळे शेतकर्याना भेडसावणारा प्रश्न निकाली निघत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

देविखिंडी येथे कृषी विभागाच्या मार्गदर्शन खाली ऊस उत्पादक शेतकर्यानी आर्दश बचत गटांनी स्थापना केली आहे.या गटातील शेतकर्यानी कारखान्याकडे टोळीची मागणी केली होती.त्यानुसार ऊसतोड कामगार आल्यानंतर तात्काळ टोळी देत गटातील शेतकर्याची ऊसतोड सुरु करण्यात आली.ऊस लागणीनुसार ऊस तोडीला प्राधान्य देऊन क्रमाक्रमाने ऊस तोड केली जाणार असल्याचे गटाचे अध्यक्ष महादेव शिंदे यांनी सांगितले. 

संपादन : घनशाम नवाथे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viraj Kane Agro ready for this year's crushing season