Vishal Patil : सांगली, मिरजेत रेल्वेच्या सुविधा द्या : विशाल पाटील; विविध प्रश्नांवर खासदारांनी वेधले संसदेत लक्ष
Sangli News : वाशांना आपले साहित्य सुरक्षित ठेवता यावे, यासाठी लॉकर नाहीत. या आवारातील सुरक्षा व्यवस्था उत्तम नाही. या पायाभूत सुविधा द्यायलाच हव्यात, तरच उत्पन्न वाढणार आहे.
सांगली : ‘‘रेल्वेचे मिरज जंक्शन आणि सांगली स्थानकावर पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. रेल्वेचा महसूल वाढायचा असेल तर या सुविधा निर्माण करायलाच हव्यात,’’ अशी स्पष्ट भूमिका खासदार विशाल पाटील यांनी संसदेत मांडली.