विटा : विट्याच्या नगरपालिकेसाठी निधी आणण्यात विद्यमान आमदार अपयशी ठरले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असतानाही एक रुपयाचा निधीही नगरपालिकेसाठी आणता आला नाही. .विट्याला पाणी पुरत नाही, तर विस्तारित पाणी योजनेसाठी निधी आणायचा होता. नगरविकासमंत्री तुमचा, खाते तुमच्याकडे, नगरपालिकेचा कारभार प्रशासकाकडे, शासनाचे प्रतिनिधी तुम्ही प्रशासक या नात्याने कारभारी तुम्ही, मग गेल्या चार वर्षांत पाणी का आणलं नाही? विट्यामध्ये विकासाच्या सर्व गोष्टी आम्ही करायच्या आणि आमच्यावर टीका करता. ‘’चोराच्या उलट्या बोंबा’’ असे प्रखड मत मनमंदिर उद्योग समूहाचे अशोक गायकवाड यांनी व्यक्त केले..Sangli News : पलूसला नंबर वन शहर करण्याची आमदार कदम यांची ग्वाही; विकासकामांची यादीच ऐकून टाळ्यांचा कडकडाट!.येथील मायाक्कानगर प्रभाग क्र. १३ चे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रतिभा चोथे, नगरसेवकपदाचे उमेदवार प्रशांत कांबळे, उमा जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सदाशिवराव पाटील होते..श्री. गायकवाड म्हणाले, विट्यामध्ये तुम्ही एकही मोठी इमारत बांधली नाही. स्वतःची बांधली असेल, पण लोकहितासाठी ठेंगा अन् आमच्यावरती टीका करता. विट्याच्या विकासासाठी चार वर्षांत एक रुपयाचा निधी आता आला नाही आणि विकासाच्या गप्पा मारता भारतीय जनता पार्टीच्या प्रादेशिक सरचिटणीस स्वाती शिंदे, शिवसेनेचे शिवाजी शिंदे, विशाल साठे, माजी आमदार सदाशिव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले..Sangli Crime News : विट्यात थरार! देशी पिस्तूल घेऊन उभा असलेला तरुण रात्रीच पोलिसांच्या जाळ्यात; एक लाखांचा मुद्देमाल जप्त.बैठकीला माजी नगरसेवक ॲड. विजय जाधव, ॲड. तानाजी जाधव, संग्राम माने, दत्ता साठे, भारती कांबळे, मारुती भिंगारदेवे, भरत कांबळे, प्रभाग क्र. १३ मधील उमेदवार, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.