

Tragic Fire Claims Four Lives in Vita
Sakal
विटा : येथील सावरकर नगरमध्ये भांड्याच्या दुकानाला भीषण आग लागून चौघांचा श्वास गुदमरून व भाजून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. विष्णू पांडुरंग जोशी ( वय ४४ ), सुनंदा विष्णू जोशी ( वय ४० ), प्रियंका योगेश इंगळे ( वय २५ ), सृष्टी योगेश इंगळे ( वय २ वर्षं ) अशी मृत्यू झालेल्यांची नांवे आहेत.