

Vaibhav Patil Promises to Vita Traders
sakal
विटा : ‘‘शहरातील किराणा व्यापाऱ्यांचे प्रश्न, अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. इथून पुढच्या कालखंडामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना अडीअडचणींना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल,’’ असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी केले.