स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर उभारणार विठ्ठलमूर्ती

अभय जोशी
Wednesday, 7 August 2019

यात्राकाळात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांना श्रीविठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही . हे लक्षात घेऊन गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी च्या धर्तीवर श्रीविठ्ठलाची 120 फूट उंचीची मूर्ती करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

पंढरपूर : यात्राकाळात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांना श्रीविठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही . हे लक्षात घेऊन गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी च्या धर्तीवर श्रीविठ्ठलाची 120 फूट उंचीची मूर्ती करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्येष्ठ कलादिग्दर्शक  नितीन देसाई आणि जिल्हाधिकारी डॉ.
 राजेंद्र भोसले यांनी या विषयीचा संकल्प केला आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्यासमवेत नितीन देसाई हे काल सायंकाळी येथे आले होते त्यावेळी श्री. देसाई यांनी पत्रकारांना याविषयीची माहिती दिली. श्री.देसाई म्हणाले प्रजासत्ताक दिनादिवशी नवी दिल्ली येथे राजपथावर वारकरी संप्रदायाचे चित्र-शिल्प उभा केले होते. त्यावेळी माझ्या मनात श्री विठ्ठला बद्दल चे भाव दाटून आले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे माझे मित्र आहेत.  त्यांना मी ही संकल्पना सांगितली. त्यांना ही संकल्पना आवडली.

आज पंढरपुरात येऊन श्रीविठ्ठलाचे दर्शन घेऊन याविषयीचा संकल्प आम्ही सोडत आहोत. 10 किलोमीटर अंतरावरून विठुरायाची भव्य मुर्ती दिसावी अशी सुमारे  एकशे वीस फूट उंचीची मूर्ती उभा करण्याचा मानस आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येणार आहे.

 प्रांताधिकारी तथा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांना याविषयी विचारले असता सकाळ शी बोलताना ते म्हणाले जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि श्री. देसाई हे  येथे आले होते. त्यांची संकल्पना अतिशय उत्तम असून पंढरपूर परिसरात कोणत्या जागेवर ही भव्य मूर्ती उभा करावयाची याविषयी चर्चा सुरू आहे 

या संकल्पनेनुसार श्री विठ्ठलाची भव्य मूर्ती पंढरपूर परिसरात उभी राहिल्यास पंढरपूरच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vitthal Statue to be build on the lines of Statue of Unity