गावातील छोट्या मोठ्या गोष्टी समजणार ; भोंग्यांचे सायरन आता नियमित वाजणार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 December 2020

ग्रामीण भागाचा आर्थिक कणा समजला जाणारा दुग्ध व्यवसाय कोरोनाच्या महामारीत काहीसा मरगळलेल्या अवस्थेत होता.

मांगले (सांगली) : ग्रामीण भागातील दुध संस्थांचे व्यवहार रुळावर येत असून गेल्या आठ महिन्यापासून दुध काढण्याच्या आणि घालण्याच्या वेळेसह गावातील आंनदाच्या आणि दुखाच्या प्रसंगी न चुकता वाजणा-या भोंग्यांचे सायरन आता नियमित वाजू लागले आहेत. 

ग्रामीण भागाचा आर्थिक कणा समजला जाणारा दुग्ध व्यवसाय कोरोनाच्या महामारीत काहीसा मरगळलेल्या अवस्थेत होता. याचा परिणाम स्थानिक दुध संस्था आणि दुध संकलन केंद्रावरही झाला होता. अवेळी येणाऱ्या संघाच्या दुध गाड्या, आठवड्याला जमा होणाऱ्या दुध बिलासाठी होणारा विलंब या सह दुध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या इतर सुविधांच्यातही सातत्य न्हवते. कोरोनाचा प्रभाव कमी होवू लागल्या नंतर गावपातळीवरील व्यवहार सुरवात झाल्यानंतर आता दुध संस्थांचे व्यवहारही सुरळीत होवू लागले आहेत. 

हेही वाचा - आठ महिन्यानंतर पुन्हा रंगू लागल्या किटी पार्ट्या -

ग्रामीण भागात दुध संस्थामधून असणारे भोंग्यांचे सायरन दुध संकलनात असणाऱ्या अनियमितेमुळे कोरोनाच्या कालावधीत बंद ठेवण्यात आले होते. पहाटे आणि संध्याकाळी दुध काढण्याच्या आणि दुध संस्थेत दुध संकलनाला सुरवात होण्याच्या वेळेत हमखास वाजणारे भोंग्याचे सायरन आता पुन्हा वाजू लागले आहेत. या भोंग्यांचे सायरन दुध संकलना बरोबरच गावात घडणाऱ्या दु:खद घटनेवेळी वाजत होते गेल्या आठ महिन्यात ते ही बंद होते ते आता सुरु झाले आहेत. 

याबरोबरच एखाद्या आनंदाच्याक्षणीही भोंगा वाजवला जात होता. संकल्पना एकच आहे की मोठ्या, छोट्या गावात घडणारी घटना भोंगा वाजल्यानंतर एकमेकांच्या चर्चेतून प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचावी ,कोरोना कालावधीत मृत्यूचे प्रमाण अधिक असूनही कोण गेले हे गावात भोंगा वाजला नाही यामुळे समजू शकले नाही, आता पुन्हा भोंग्याचा सायरन सुरु झाल्यामुळे गावातील छोट्या मोठ्या गोष्टी समजणे सोपे झाले आहे.

हेही वाचा - गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या ; कारण मात्र अस्पष्ट -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the voice of siren again start in village level in sangli