सांगली : येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Walchand College of Engineering) जय शिरगुप्पे या विद्यार्थ्याला डाटा सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या अमेरिकेतील बहुराष्ट्रीय रुबरिक कंपनीने (Rubric Co. America) तब्बल दीड कोटींचे वार्षिक पॅकेज देऊ केले आहे. महाविद्यालयाच्या इतिहासातील हे उच्चांकी पॅकेज आहे. कँपस मुलाखतीतून महाविद्यालयातील ८४ टक्के विद्यार्थ्यांना सरासरी दहा लाखांहून अधिक रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. आज महाविद्यालयाचा स्वायत्तता प्राप्त झाल्यानंतरचा १५ वा प्रारंभ दिन समारंभ होत आहे.