सांगली : वाळव्याच्या तरूणाचा दहशतवाद्यांशी संबंध ?

Walwa Residece Youth Relationship With Terrorists Sangli News
Walwa Residece Youth Relationship With Terrorists Sangli News

वाळवा ( सांगली)  - दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयावरून येथील एका तरुणाला उत्तर प्रदेशच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले आहे. अतिशय गुप्तपणे दोन दिवसांपूर्वी ही कारवाई झाली. याची गावात दबक्‍या आवाजात चर्चा सुरू असून, प्रामुख्याने दहशतवादी कारवायांशी संबंधित आर्थिक व्यवहाराच्या संशयावरून या तरुणाला ‘एटीएस’ने ताब्यात घेतल्याचे समजते. स्थानिक पातळीवरील पोलिस यंत्रणेला याची कोणतीही माहिती ‘एटीएस’ने लागू दिलेली नाही. परिणामी, दहशतवाद्यांशी संबंधित तरुणांचे नेटवर्क अगदी ग्रामीण भागापर्यंत विकसित झाल्याचे या निमित्ताने समोर येत आहे. 

दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे दहशतवाद प्रतिबंधक पथक येथे दाखल झाले होते. गावातील एका तरुणाला त्यांनी अतिशय शिस्तबद्ध आणि गुप्त कारवाई करून ताब्यात घेतले. सध्या हा तरुण ‘एटीएस’च्या लखनौ येथील कोठडीत आहे. हा तरुण गावात अतिशय शाही पद्धतीने वावरत होता. भरजरी कपडे, महागडे मोबाईल, महागडी चारचाकी तो वापरत होता. त्याचा रुबाब एखाद्या राजासारखा होता. घरची परिस्थिती मध्यम असताना त्याचे शाही वागणे सतत चर्चेचा विषय होते. दहशतवादी कारवायांशी हा तरुण निगडित असावा, याची जराशीही कल्पना त्याचे कुटुंब अथवा गावात कोणाला नव्हती. मात्र, उत्तर प्रदेश ‘एटीएस’ने त्याला ताब्यात घेतल्यावर गावात 
चर्चेचे उधाण आले आहे.

या कारवाईनंतर ‘टेरर फंडिंग’च्या प्रवाहात अनेक तरुण गुंतले असण्याची शक्‍यता आहे. त्या अनुषंगाने अनेकांचे धाबे दणाणले आहे. गावात एवढी मोठी कारवाई प्रथमच झाली आहे. याबाबत अद्यापही पुरेसा तपशील उपलब्ध झालेला नाही. मात्र, दहशतवादी कारवायांशी संबंधित यंत्रणांना पैशांच्या देवाण-घेवाणीत या तरुणाचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. अतिशय गुप्तपणे कारवाई झाली असली तरी त्याची उघड चर्चा आता सुरू झाली आहे.

‘एटीएस’च्या कारवाईबाबत मोठी गुप्तता असते. त्यामुळे स्थानिक पोलिस यंत्रणेला कोणतीही माहिती मिळत नाही. बातम्या फुटू नयेत म्हणून एटीएस ही काळजी घेते. वाळव्यातील कारवाईबाबत कोणतीही माहिती नाही.
- भानुदास निंभोरे,
पोलिस निरीक्षक, आष्टा पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com