असे आहे राज्य नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात 13 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. यंदा 29 नाटकांची पर्वणी रसिकांना मिळणार असून स्पर्धा कालावधीत फक्त रविवारी दोन प्रयोग होतील. 15 नोव्हेंबरला लक्ष्मण द्रवीड लिखित "थिंक पॉइंट' या नाटकाने स्पर्धेचा पडदा उघडणार

कोल्हापूर - राज्य नाट्य स्पर्धेत रोज दोन प्रयोगांच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला. 
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आज सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून 15 नोव्हेंबरपासून येथील प्राथमिक फेरीला प्रारंभ होईल.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात 13 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. यंदा 29 नाटकांची पर्वणी रसिकांना मिळणार असून स्पर्धा कालावधीत फक्त रविवारी दोन प्रयोग होतील. 15 नोव्हेंबरला लक्ष्मण द्रवीड लिखित "थिंक पॉइंट' या नाटकाने स्पर्धेचा पडदा उघडणार असून यशोधरा पंचशील थिएटरतर्फे हे नाटक सादर होणार आहे. 

स्पर्धेचे वेळापत्रक असे.. 

- 15 नोव्हेंबर : यशोधरा संस्था : थिंक पॉइंट 
- 16 नोव्हेंबर : वसुंधरा संस्था : नटरंग 
- 17 नोव्हेंबर : वरेरकर नाट्यसंस्था, बेळगाव : वृंदावन (दुपारी 12वा.), सुगुण नाट्यकला संस्था : पुरुष (सायंकाळी 7 वाजता.) 
- 18 नोव्हेंबर : सिद्ध्रेश्वर संस्था, सादळे : वारणेचा वाघ 
- 19 नोव्हेंबर: साई नाट्यधारा, हलकर्णी : खेळ 
- 20 नोव्हेंबर : तुकाराम माळी मंडळ : एक होता बांबू काका 
- 21 नोव्हेंबर : लक्ष्मी वसाहत मंडळ : आपले बुवा असे आहे 
- 22 नोव्हेंबर: शाहूवाडी शैक्षणिक व्यासपीठ, मलकापूर : बॅलन्स शीट 
- 23 नोव्हेंबर : संस्कार बहुउद्देशीय संस्था : लग्न शांतूच्या मेव्हणीचं 
- 24 नोव्हेंबर : संगीत नाट्यविभाग, शिवाजी विद्यापीठ : तुघलक (दुपारी 12 वा.), सम्राट नागरी पतसंस्था, हातकणंगले : बळ (सायंकाळी 7 वाजता.) 
- 25 नोव्हेंबर : रूद्रांश ऍकॅडमी : मोठ्यांचा शेक्‍सपिअर 
- 26 नोव्हेंबर : राष्ट्रीय मोडी प्रबोधिनी : संसार टॉम अँड जेरीचा 
- 27 नोव्हेंबर : राणी अहिल्याबाई वाचनमंदिर, कागल : नातीगोती 
- 28 नोव्हेंबर : रंगयात्रा, इचलकरंजी : हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनीया वोल्फ 
- 29 नोव्हेंबर : प्रज्ञान कला अकादमी : हत्ती आला रे 
- 30 नोव्हेंबर : फिनिक्‍स क्रिएशन : ह्येच्या आईचा वग 
- 1 डिसेंबर : परिवर्तन कला फाउंडेशन : मी सारंगी (दुपारी 12.), निष्पाप कलानिकेतन, इचलकरंजी : युद्ध नको मज बुद्ध हवा (सायंकाळी 7 वाजता.) 
- 2 डिसेंबर : नाट्यशुभांगी, जयसिंगपूर : सूर्याची पिल्ले 
- 3 डिसेंबर : कृषीदूत संस्था : नियतीच्या बैलाला 
- 4 डिसेंबर : हृदयस्पर्श फाउंडेशन : भेंद्रयाचा वाघ 
- 5 डिसेंबर : गायनसमाज देवल क्‍लब : देव हरवला 
- 6 डिसेंबर : कान्होपात्रा किणीकर रंगमंच : ऊन पाऊस 
- 10 डिसेंबर : भारतवीर मित्र मंडळ, कसबा बावडा : ऐश्वर्या ब्युटी पार्लर 
- 11 डिसेंबर : भगतसिंग युवक मंडळ, बेळगाव : खर काहीच नसतं 
- 12 डिसेंबर : आदित्य हौशी नाट्यसंस्था : आर्ट 
- 13 डिसेंबर : आदर्श स्पोर्टस, निगवे : सविता दामोदर परांजपे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Drama Competition Time Table Declared In Kolhapur