

Election officials and security teams prepare polling stations ahead of voting in Walwa taluka.
sakal
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. ११ जिल्हा परिषद गट व २२ पंचायत समिती गणांसाठी एकूण ३६० मतदान केंद्रे असून, मतदान केंद्रनिहाय एक व एकूण संख्येच्या १० टक्के राखीव इव्हीएम मशीन ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागामर्फत देण्यात आली आहे.