वारकरी झाले धारकरी ः इंदोरीकरांच्या समर्थनार्थ अकोल्यात बंद, निषेधाची दिंडी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 February 2020

इंदोरीकर महाराज हे अकोले तालुक्यातील इंदोरी या गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या गावापासून युवकांनी मोटारसायकल रॅली अकोल्यापर्यंत आणली. तेथे आल्यानंतर सर्व मोर्चेकरी भजन करीत तहसील कार्यालयावर मोर्चाने गेले. या वेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

नगर ः निवृत्तीमहाराज इंदोरीकर यांच्यासाठी वारकही हे धारकरी झाले आहेत. अकोले तालुक्यातील सर्व वारकरी, युवक, राजकीय नेते एकवटले आहेत. महाराजांची बदनामी रोखण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. गाव बंद ठेवून त्यांनी तृप्ती देसाई यांचा निषेध केला आहे.

इंदोरीकर महाराज हे अकोले तालुक्यातील इंदोरी या गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या गावापासून युवकांनी मोटारसायकल रॅली अकोल्यापर्यंत आणली. तेथे आल्यानंतर सर्व मोर्चेकरी भजन करीत तहसील कार्यालयावर मोर्चाने गेले. या वेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

या भजन आंदोलनात राष्ट्रवादीचे अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, शिवसेनेच्या महिला पदाधिकरा स्मिता अष्टेकर, तसेच वारकरी उपस्थित होते.

इंदोरीकर महाराजांनी पुत्रप्राप्तीच्या कथित वक्तव्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी रान उठवले आहे. त्यांनी नगरमध्ये येऊन पोलिसांना इंदोरीकरमहाराजांनी महिलांचा अवमान केला आहे, असा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न के्लयास इंदोरीकर महाराजांना अकोल्यात त्यांच्या गावात जाऊन काळे फासण्याचा इशारा दिला आहे.

राज्यभर इंदोरीकर महाराजांच्या संदर्भात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराजांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. आतापर्यंत संयमाची भूमिका बजावलेले अकोलेकर आक्रमक झाले आहेत. त्यांनीही तृप्ती देसाई यांना जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान, इंदोरीकरांनी आपण असे वक्तव्य केलेच नसल्याचा खुलासा पीसीपीएनडीटी या समितीकडे दिला आहे. आपल्या वक्तव्यारून कोणी दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असेही म्हटले तरीही वादंग सुरूच राहिल्याने सर्व वारकरी संतापले आहेत. त्यातून त्यांनी आज गाव बंद ठेवले.

सर्व सामान्य कुटुंबातील महिलांनीही इंदोरीकरमहाराजांच्या मागे बळ उभे केले आहे. तृप्ती देसाई यांनी अकोल्यात पाऊस ठेवूनच दाखवावे. त्यांच्या तोंडात आम्ही शेण घालू असा इशाराही आंदोलक महिलांनी सभास्थळी दिला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warakari became Dharakari in Akola