
शिराळा : शिराळा तालुक्यात तीन दिवसांपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. चांदोली धरण परिसरात २४ तासांत ४०, तर आठ तासांत ३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वारणा धरणात ३०.९६ टी. एम. सी. म्हणजे ९०.०२ टक्के पाणीसाठा आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सायंकाळी ७ पासून धरणाच्या विद्युतगृहातून ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.