या शहरात कचरावाहू वाहनांवर ‘जीपीएस’ सिस्टिमद्वारे वाॅच...

Watch through the GPS system on garbage in the belgum sity city
Watch through the GPS system on garbage in the belgum sity city
Updated on

बेळगाव - महापालिकेने शहर स्वच्छतेशी संबंधित ९५ वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविली आहे. त्यात कॉम्पॅक्‍टर, डंपर प्लेसर्स, टिप्पर व ऑटो टिप्परचा समावेश आहे. ‘ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम’ या नावाने ओळखली जाणारी ही यंत्रणा स्मार्ट सिटी योजनेच्या कमांड व कंट्रोल सेंटरशी जोडली जाणार आहे. सेंटर कार्यान्वित झाले की जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून या ९५ वाहनांवर लक्ष ठेवता येणार आहे. यामुळे वाहनांचा गैरवापर टळणार आहे. इंधन बचतीच्या दृष्टीनेही ही यंत्रणा महापालिकेला फायद्याची ठरणार आहे.

वाहनांवर लक्ष ठेवता येणार

शहर स्वच्छतेच्या कामासाठी महापालिका तसेच नऊ सफाई ठेकेदारांची वाहनेही वापरली जातात. या सर्व वाहनांवर जीपीएस बसविण्यात आले आहे. घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी ऑटो टिप्परचा वापर केला जातो. पण, हे टिप्पर संबंधित प्रभागातील प्रत्येक घरासमोर जाते की नाही. प्रत्येक घरातून कचरा जमा करून घेतला जातो की नाही हे जीपीएसमुळे कळणार आहे. ऑटो टिप्परच्या माध्यमातून जमा होणारा कचरा टिप्पर, कॉम्पॅक्‍टर व डंपर प्लेसर्सच्या माध्यमातून तुरमुरी कचरा डेपोत नेला जातो. जीपीएस यंत्रणा बसविल्यामुळे ही सर्व वाहने कचरा घेऊन डेपोकडे जातात का? कोणते वाहन कितीवेळा कचरा डेपोकडे गेले? कचरा डेपो सोडून एखादे वाहन अन्यत्र गेले का? यावर लक्ष ठेवता येते. ही वाहने थांबविण्यासाठी महापालिकेने जागा निश्‍चित करून दिली आहे. मात्र, एखादे वाहन अन्यत्र थांबत असेल. त्यातून इंधन काढण्याचा प्रयत्न होत असेल तर जीपीएसमुळे ते कळू शकेल. त्यामुळेच महापालिकेने एवढ्या मोठ्या संख्येने वाहनांना जीपीएस बसविले आहे.

१०६ वाहने कमांड व कंट्रोल सेंटरच्या नियंत्रणात

स्मार्ट सिटी योजनेतील कमांड व कंट्रोल सेंटरचे काम पूर्ण झाले असले तरी ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. ते सेंटर सुरु झाले की मग जीपीएस यंत्रणा त्या सेंटरशी जोडली जाईल. पालिकेचा कर्मचारी तेथे तैनात केला जाईल. तो कर्मचारी या वाहनांवर लक्ष ठेवेल. शहरातील कचऱ्याची नियमित उचल, घंटागाडी योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी या अनुषंगाने ही यंत्रणा पालिकेसाठी फायद्याची ठरणार आहे.
आणखी ११ वाहनांना बसविणारमहापालिकेने तीन महिन्यांपूर्वी ११ नवे ऑटो टिप्पर खरेदी केले आहेत. या ऑटो टिप्परवर अद्याप ही यंत्रणा बसविलेली नाही. त्यावर यंत्रणा बसविली की १०६ वाहने कमांड व कंट्रोल सेंटरच्या नियंत्रणात येणार आहेत.

‘आरएफआयडी’चा उपयोग करणार

स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील ४० हजार इमारतींवर आरएफआयडी हे उपकरण बसविले आहे. संबंधित इमारतीमधील कचऱ्याची उचल झाली की नाही हे या उपकरणामुळे कळणार आहे. जीपीएस यंत्रणेसोबतच आरएफआयडी उपकरणही शहर स्वच्छतेच्या कामात उपयोगी ठरणार आहे. कमांड व कंट्रोल सेंटर सुरू झाल्यानंतर हे आरएफआयडी उपकरणही कार्यािन्वत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com