हिडकल जलाशयात सुमारे सव्वा दोन टीएमसी कमी पाणी; पाणी टंचाईच्या झळा बसणार ?

water scarcity
water scarcitysakal media
Updated on

बेळगाव : बेळगाव शहराला पाणीपुरवठा (water supply) करणाऱ्या राकसकोप जलाशयात (Rakaskop dam) यंदा गतवर्षीच्या तुलनेत तीन फूट अधिक पाणीसाठा आहे. तर हिडकल जलाशयात सुमारे सव्वा दोन टीएमसी कमी (water TMC) पाणी आहे. अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे या साठ्यात थोडीफार वाढ होत असल्याने यंदा पाणी टंचाई (water scarcity) उद्भविण्याची शक्यता कमी आहे.

water scarcity
नवी मुंबई : टक्केवारीमुळे महापालिकेतील अधिकारी तणावाखाली; नेते मंडळींकडून दबाव

राकसकोप जलाशयाची क्षमता २,४७७.०० फूट तर हिडकल जलाशयाची क्षमता ५१ टीएमसी आहे. मंगळवारी (ता. ५) राकसकोप जलाशयात २,४६३.९० इतका पाणीसाठा होता. तर गेल्यावर्षी याच दिवशी २,४६१.१० फूट पाणी होते. म्हणजेच यंदा २.८ फूट अधिक पाणी आहे. हिडकल जलाशयात मंगळवारी १५.२४ टीएमसी पाणी होते. तर गतवर्षी १३.१० टीएमसी पाणी होते. त्यामुळे, २.१४ पाणीसाठा कमी आहे. एका जलाशयात कमी व दुसऱ्या जलाशयात अधिक पाणी आहे. यामुळे एल अँन्ड टीला पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. गतवर्षी अनेक वेळा अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे, जलाशयातील पाणी वाढत राहिले. यंदाही अवकाळी पाऊस अधिक झाल्यास ही चिंता मिटणार आहे.

नियोजन नसल्याने सध्या शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. मात्र, मे महिन्यात परिस्थिती बिकट होऊ शकते. त्यासाठी आतापासून पाण्याचे योग्य नियोजन हवे. राकसकोप जलाशयातील पाणीसाठा मे अखेरपर्यंत पुरतो. तसेच हिडकलमधूनही पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जाते. याकडे दुर्लक्षच केले जाते. एकदा गळती लागल्यास आठ ते दहा दिवस त्याकडे दुर्लक्ष होते. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. यासाठी वेळीच गळत्या काढणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Sugar Market
Guhagar Vijapur highway latest update
Shaktipeeth Highway Protes
Sangram Jagtap statement on Kesarekar murder
Marathi News Esakal
www.esakal.com