कर्नाटकच्या पाण्याची 46 गावांना आस, जत तालुक्यात टंचाईच्या झळा; द्राक्षबागा, डाळिंब, ऊस पिके अडचणीत

महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या सरकारकडे अधिकृतपणे टंचाई निवारणाचा भाग म्हणून पाण्याची मागणी केली पाहिजे.
Water Shortage in Jat Taluka Mhaisal Scheme
Water Shortage in Jat Taluka Mhaisal Schemeesakal
Summary

सध्या कृष्णा नदी वाहती ठेवण्यासाठी म्हणून वारणा आणि कोयना धरणातून सोडलेले पाणीच कर्नाटकातील सिंचन योजनांना मिळत आहे.

सांगली : जत तालुक्यासाठी विस्तारित म्हैसाळ योजनेची (Mhaisal Scheme) कामे तातडीने सुरू व्हावीत, यासाठी आंदोलने सुरू आहेत. मात्र त्याहून अधिक सध्याची गरज म्हणजे या भागातील ४६ गावांमधील नगदी पिके जगवण्यासाठी कर्नाटकातून तातडीने पाणी पुरवठा व्हावा, यासाठी पाठपुराव्याची गरज आहे. जानेवारीपासूनच या भागात टंचाईच्या झळा बसत आहेत.

याबाबत महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या सरकारकडे अधिकृतपणे टंचाई निवारणाचा भाग म्हणून पाण्याची मागणी केली पाहिजे. सध्या या प्रश्‍नाकडे लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी या सर्वांचेच दुर्लक्ष आहे. परिणामी सुमारे चार हजारांवर द्राक्षबागा, डाळिंब, ऊस पिके अडचणीत आहेत.

Water Shortage in Jat Taluka Mhaisal Scheme
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी महत्त्वाची बातमी; साताऱ्यात 'सेफ हाउस'ची निर्मिती, काय आहे खासियत?

जत तालुक्याच्या आग्नेय भागातील उमदी आणि परिसरातील ४६ गावे म्हैसाळ योजनेपासून वंचित आहेत. तथापि या भागास गेल्या काही वर्षांत कर्नाटकातून पाणी पुरवठा होत आहे. सीमेवरील विजयपूर जिल्ह्यातील यत्नाळ तलावापर्यंत कर्नाटकच्या सिंचन योजनांचे पाणी येते. तिथून हे पाणी चडचण तालुक्यात महाराष्ट्रातील उमदी-जालिहाळ भागातून नैसर्गिक उताराने ओढ्या-ओढ्यांतून जाते. या योजनेतून ४६ गावांतील टंचाई संपली आहे.

Water Shortage in Jat Taluka Mhaisal Scheme
इतिहासाची 57 वर्षांनी पुनरावृत्ती! इंदिरा गांधी यांच्यानंतर कुटुंबाचा 'हा' सदस्य राज्यसभेत जाणार

गेल्या काही वर्षांत दोन्ही तालुक्यांतील शेतकरी स्थानिक नेतेमंडळींशी संपर्क साधून कर्नाटकातून पाणी पुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्नशील असतात. जवळपास साडेचार हजार एकरांवर द्राक्षबागा, तितकेच डाळिंब क्षेत्र, दीड हजार एकरांवर ऊस असे पीक क्षेत्र या भागात आहे. या भागासाठी कर्नाटकच्या सिंचन योजनांमधून पाणी घ्यावे, यासाठी येरळा प्रोजेक्ट सोसायटीने सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून आता या भागासाठी स्वतंत्र विस्तारित म्हैसाळ योजना मंजूर झाली.

सुमारे नऊशे कोटींची कामे सध्या प्रस्तावित आहेत. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी साडेसहा टीएमसी पाणी केवळ जतसाठी राखीव ठेवण्याची घोषणा केली. त्यानंतर सर्वांचा फोकस ही विस्तारित म्हैसाळ योजना पूर्ण करण्याकडे आहे. सध्या उमदी आणि बालगावमध्ये यासाठी आंदोलनेही सुरू आहेत. कर्नाटकला याआधी महाराष्ट्रातून दिलेले साडेतीन टीएमसी पाणी शिल्लक आहे.

Water Shortage in Jat Taluka Mhaisal Scheme
लोकसभेसाठी महादेव जानकर 'या' मतदारसंघांतून निवडणूक लढवणार; 'रासप'ची स्वतंत्र लढण्याची तयारी

सध्याही कृष्णा नदी वाहती ठेवण्यासाठी म्हणून वारणा आणि कोयना धरणातून सोडलेले पाणीच कर्नाटकातील सिंचन योजनांना मिळत आहे. तेथील शेतकरी हे पाणी जत तालुक्यात येण्यापासून रोखत आहेत. आजघडीला यत्नाळ तलाव भरला आहे. याशिवाय, शिरनाळ कालवा पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. तेथे पाण्याची उपलब्धता आहे, तर शेजारीच महाराष्‍ट्रातील भाग पाण्यासाठी आसुसलेला आहे.

विस्तारित म्हैसाळ योजना पूर्ण होण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. तोपर्यंत आपल्याला कर्नाटकच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागणार आहे. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई उपाययोजनांचा भाग म्हणून कर्नाटक सरकारशी अधिकृतपणे पत्रव्यवहार करावा. त्या बदल्यात वारणा धरणातून जतसाठी राखीव असलेले पाणी कर्नाटकला द्यावे.

-एन. व्ही. देशपांडे, सचिव, येरळा प्रोजेक्ट सोसायटी

Water Shortage in Jat Taluka Mhaisal Scheme
Mango Board : स्वतंत्र आंबा बोर्डासाठी 200 कोटींची तरतूद; रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना होणार फायदा

सध्या कर्नाटकला पाण्याची आवश्‍यकता आहे. आपल्याकडे नैसर्गिक उताराने येणारे पाणी त्यामुळेच कमी झाले आहे. त्यासाठी वारणा धरणातून जतसाठी राखीव असलेले पाणी कर्नाटकला देऊन तिथून तातडीने पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. मी त्यांची भेट घेत आहे.

-विक्रम सावंत, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com