esakal | रिझर्व्ह न्हवे, हीच आपली खरी बँक : डॉ. राणा
sakal

बोलून बातमी शोधा

 Water is your real bank: Dr. Rana

आपली खरी बॅंक "आरबीआय' नसून पाणी हीच असली बॅंक आहे. आज देशात जमिनीच्या पोटातील 72 टक्के पाणी रिक्त असून त्याबाबत गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

रिझर्व्ह न्हवे, हीच आपली खरी बँक : डॉ. राणा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : आपली खरी बॅंक "आरबीआय' नसून पाणी हीच असली बॅंक आहे. आज देशात जमिनीच्या पोटातील 72 टक्के पाणी रिक्त असून त्याबाबत गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी येथे केले.

महात्मा गांधी ग्रंथालयाच्यावतीने आयोजित व्याख्यानात "महात्मा गांधी आणि पर्यावरण' या विषयावर ते बोलत होते. विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक मेहता, उपाध्यक्ष डॉ. लता देशपांडे, कार्यकारी मंडळ अध्यक्ष विलास शहा, उपाध्यक्ष सलील लिमये, कार्यवाह अस्मिता इनामदार, शरद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. राणा म्हणाले,""महात्मा गांधींनी देशात स्वातंत्र्यासाठी आंदोलन उभे केले. त्याच काळात मॅंचेस्टर कंपनीने कपड्यांच्या माध्यमातून लूट सुरू केली. तेंव्हा गांधीजींनी छोटासा चरखा घेऊन स्वदेशीची चळवळ उभी केली. देशासाठी गांधीजींनी लढा उभा केला. त्यातून स्वातंत्र्य मिळाले. आज गांधीजी असते तर सर्वप्रथम त्यांनी बाटलीबंद पाण्याच्या व्यापारातील लूट थांबवली असती. बाटलीबंद पाण्याचा गतवर्षीचा व्यापार 50 हजार कोटी इतका आहे. देशातील जमिनीच्या पोटातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. 72 टक्के पाणीसाठा रिकामा आहे. भारत सरकारची, सेंट्रल वॉटर कमिशन आणि निती आयोगाची ही माहिती आहे. आपली खरी बॅंक आरबीआय नसून पाणी हीच असली बॅंक आहे. कमी होत असलेल्या पाणीसाठ्याबद्दल गांभीर्याने विचार आवश्‍यक आहे.'' 

ते म्हणाले,""देशातील 365 जिल्हे आणि 17 राज्यात जमिनीखालील पाण्याची स्थिती गंभीर आहे. मनुष्य आजारी पडला आणि ताप आलातर ज्याप्रमाणे आपण उपाय करतो. त्याचप्रमाणे तापलेल्या पृथ्वीवर म्हणजेच ग्लोबल वार्मिंगवर उपाय करण्याची गरज आहे. तापलेल्या जमिनीवर पाणी अडवून म्हणजेच त्यावर पाण्याची पट्टी ठेवून तापमान कमी करण्याची गरज आहे. तलाव, बंधारे बांधून हिरवळ निर्माण करावी लागेल. खनिज उत्खनन, प्रदुषण रोखण्याची गरज आहे. धान्य पिकवण्याची पद्धत आणि पाऊस यांची सांगड घातली तरच जमिनीतील पाणी वाचेल. कमी पाण्यात जादा उत्पन्न घेण्याची गरज आहे.'' 

म. गांधींच्या पुतळ्यास सुताचा हार अर्पण करण्यात आला. लता देशपांडे यांनी स्वागत तर सलिल लिमये यांनी परिचय करून दिला. अस्मिता इनामदार यांनी आभार मानले.