पोपटराव म्हणतात, अपमान पचवला की मान मिळालाच म्हणून समजा

We need to learn to work for our society
We need to learn to work for our society

नगर : ""समाजकार्य करण्यासाठी प्रत्येक समाजसेवकाकडे शुद्ध विचार असावेत. त्यांचे जीवन निष्कलंक असावे. महत्त्वाचे म्हणजे अपमान पचविण्याची शक्ती त्याने ठेवली, तर समाजकार्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात करता येते. ही सर्वच वैशिष्ट्ये पोपटराव पवार यांच्याकडे असल्याने त्यांच्या कार्याचा देशपातळीवर गौरव झाला,'' अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पवार यांचा आज गौरव केला. 

राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांना पद्मश्री बहुमान जाहीर झाल्याबद्दल नगरवासीयांतर्फे त्यांचा सपत्नीक जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. हजारे आणि ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते हा सत्कार झाला. त्या वेळी हजारे यांनी पोपटराव पवार यांच्याविषयी लिहिलेल्या भावना "सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी सभागृहात वाचून दाखविल्या. आमदार अरुण जगताप, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शरद कोलते, महापौर बाबासाहेब वाकळे, प्रसिद्ध उद्योजक प्रदीप गांधी आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 


पवार यांना भविष्यात पद्मभूषण पुरस्कारानेही सरकारने सन्मानित करावे. त्या वेळी पवार यांच्या होणाऱ्या सन्मानामुळे माझ्या आनंदाला पारावर उरणार नाही, अशीही भावना हजारे यांनी लिहिली. 


डॉ. लहाने म्हणाले, ""अण्णा हजारे व पोपटराव पवार या दोन्ही समाजसेवकांचा थेट शासनावर अंकुश निर्माण झाला आहे. राळेगणसिद्धी व हिवरेबाजारमधील ही जागृत देवस्थाने आहेत. त्यांच्या कार्याचा करावा तेवढा गौरव थोडाच आहे. त्यांच्या कार्याचा सर्वांनाच अभिमान राहील.'' ग्रामीण भागात पाण्यासाठी केलेल्या कामाबद्दल सरपंचपदाच्या व्यक्तीला भारत सरकारने प्रथमच पद्मश्री पुरस्काराने गौरविले असल्याचेही ते म्हणाले. 


सत्काराला उत्तर देताना पवार यांनी 1990पासूनचा गावाचा इतिहास सांगितला. या संपूर्ण समाजकार्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे सांगून पद्मश्री बहुमानामुळे खूप मोठी जबाबदारी खांद्यावर पडली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शोभा पवार यांनी पवार यांचा कौटुंबिक प्रवास सांगितला. महापौर वाकळे, डॉ. कोलते, गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. 


आमदार संग्राम जगताप यांनी प्रास्ताविक केले. पवार यांचे नगरशी असलेले नाते जगताप यांनी उलगडून दाखविले. "सकाळ'चे मुख्य बातमीदार विठ्ठल लांडगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रेरणा प्रतिष्ठानाचे समन्वयक जॉय लोखंडे यांनी आभार मानले. 

स्वच्छ प्रेरणा अभियानाचा प्रारंभ 
आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ प्रेरणा अभियानाचा या वेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, डॉ. तात्याराव लहाने, पोपटराव पवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नगर शहरातील शाळा, माध्यमिक विद्यालये व महाविद्यालयांमधून प्रेरणा प्रतिष्ठानातर्फे आता स्वच्छतेचा जागर सुरू करण्यात येणार आहे. स्वच्छतेची प्रेरणा विद्यार्थिदशेतच मिळायला हवी, अशी संकल्पना आमदार जगताप यांनी मांडली असून, आजपासून त्याचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. 
 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com