दरोडेखोरांच्या टोळीकडून शस्त्रास्त्रे जप्त

crime story
crime story

नगर: दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नगर-पुणे रस्त्यावर म्हसणे फाटा येथे सापळा लावून पकडले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, तलवारी, कटावणी, मोबाईल, असा 48 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

लंगड्या अंकुश काळे (वय 40, रा. रांजणगाव मशीद), पिंट्या ऊर्फ अशोक पांडा पवार (वय 35, रा. रांजणगाव, मशीद, शेखर ऊर्फ अतुल उदाशा भोसले (रा. कोळगाव, ता. श्रीगोंदे) यांच्यासह अल्पवयीन मुलाचा आरोपींमध्ये समावेश आहे. कारवाईदरम्यान दोल्या संजय भोसले, हुल्या पंडित भोसले (दोघे रा. कोळगाव) पळून गेले. 

काही साथीदारांसह लंगड्या काळे दरोडा घालण्यासाठी विसापूर- पारनेर रस्त्याने जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नगर-पुणे रस्त्यावर म्हसणे फाटा येथे रात्री सापळा लावला. विसापूरकडून दोन दुचाकी येताना दिसल्या.

पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, ते पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी झडप घालून वरील चौघांना पकडले. मात्र, दुचाकीवर मागे बसलेले दोन आरोपी उड्या टाकून पळून गेले. पोलिसांनी आरोपींकडून दोन दुचाकी, तलवारी, मोबाईल, असा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रेय हिंगडे, बबन मखरे, पोलिस नाईक सुनील चव्हाण, संदीप पवार, रवींद्र कर्डिले, ज्ञानेश्‍वर शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

लंगड्याविरुद्ध 23 गंभीर गुन्हे 
आरोपी लंगड्या अंकुश काळे याच्याविरुद्ध श्रीगोंदे, पारनेर, बेलवंडी, नगर तालुका पोलिस ठाण्यांत 23 गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवाय, अन्य दोन आरोपींविरुद्ध बेलवंडी, लोणीकंद पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com