कोरोनामुळे विवाह सोहळ्यावर फिरले पाणी

wedding ceremony cancelled due to Corona
wedding ceremony cancelled due to Corona

पेड : सध्या कोरोना मुळे जनजीवन ठप्प झाले आहे. अजुन किती दिवस लॉकडाऊन राहणार हे निश्‍चित नसले तरीसुद्धा यंदाच्या हंगामातील विवाह मुहूर्तावर पाणी फिरले असून एप्रिल, मे व जून या तीन महिन्यातील विवाह सोहळे स्थगित करण्याची वेळ आली आहे. विवाह जुळलेल्या युवक-युवती तसेच आप्तेष्ट व नातेवाईक या सर्वांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

कोरूना विषाणूमुळे जगभरात हाहाकार उडवला आहे. त्यामुळे बाजारपेठेत सर्वत्र सन्नाटा आहे. कोरोनाचे पडसाद सर्वच क्षेत्रात नकारात्मक पद्धतीने उमटले आहेत. कोरोना मुळे लग्नसोहळ्याचे मंगल सुर सुद्धा बेसूर झाले आहेत. विवाह बंधनात अडकून नव्या आयुष्याची सुरुवात करण्याच्या तयारीत असलेल्या वधू-वरांच्या स्वप्नांना तूर्तास तरी ब्रेक लागला आहे.

त्यामुळे यंदाच्या हंगामातील लग्नसोहळे जवळपास हद्दपार झाल्यात जमा आहेत. महाराष्ट्रामध्ये मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मार्च महिन्यातील आठ तारखेला विवाह मुहूर्त हा अखेरचा मुहूर्त ठरला आहे. त्यानंतर विवाह सोहळ्यावर बंदी घालण्यात आली आहे. लॉन्स, मंगल कार्यालये बंद करण्यात आली आहेत. तसेच मंदिरावर ही बंदी घालण्यात आली आहे. 

सध्या एप्रिल, मे व जुन या तीन महिन्यात तब्बल 17 विवाह मुहूर्त आहेत. मे महिन्यात सर्वाधिक 10 विवाह मुहूर्त आहेत. एप्रिलमध्ये 15, 16, 26, 27, मे महिन्यात 2, 5, 6, 8, 12, 14, 17, 18, 19, 24 तर जून मध्ये 11, 14, 15 असे विवाह मुहूर्त आहेत. अनेक कुटुंबांनी या तारखा निश्‍चित केल्या होत्या. मात्र कोरोना या संकटामुळे नियोजित लग्नाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळी नंतर नवीन तारखा धरून लग्नसोहळ्याला गती येणार आहे. 

व्यवसायिकांनाही फटका 
कोरोना मुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नियोजित विवाह सोहळे रद्द करण्यात आल्याने लग्न कार्याशी संबंधित असणारे लॉन्स, मंगल कार्यालय, वाजंत्री, कॅटर्स, डेकोरेशन, पत्रिकावाले, फर्निचर दुकानदार, सराफ, कापड दुकानदार, मंडपवाले, छायाचित्रकार या व्यावसायिकांना फटका बसला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com