बेळगावात उद्यापासून 3 दिवस Weekend Lockdown; खरेदीसाठी झुंबड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगावात उद्यापासून 3 दिवस Weekend Lockdown; खरेदीसाठी झुंबड

बेळगावात उद्यापासून 3 दिवस Weekend Lockdown; खरेदीसाठी झुंबड

बेळगाव : शनिवार (२२) पासून सोमवार (२४) मे पर्यंत विकेंड लॉकडाउनची (weekend lockdown) जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. (belgaum district) या काळात केवळ रुग्णालये, औषध दुकाने आणि दूध डेअरी वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे (immergency services) बंद राहतील. त्यामुळे नागरिकांनी शुक्रवारी (ता. २१) पहाटेपासूनच खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. पोलिसांनी देखील नागरिकांना खरेदीसाठी काही प्रमाणात सूट दिल्याचे दिसून आले. १० नंतर मात्र, पुन्हा दुकाने बंद करण्यास सांगण्यात आली.

सकाळी ६ ते १० पर्यंत जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. तरीदेखील बहुतांशजण सकाळी दहा नंतरही विनाकारण रस्त्यावर फिरत होते. कोरोनाचा (covid-19) संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. तरीदेखील दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. लॉकडाउन करून देखील कोरोना संसर्ग वाढत असल्याने (belgaum collector) जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शनिवारपासून (ता. २२) ते सोमवारपर्यंत (ता. २४) विकेंड लॉकडाउनची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या

हेही वाचा: ATM फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला; 53 लाखांचा डल्ला हुकला

काळात कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरू नये, अन्यथा संबंधितांना पोलिसांच्या कारवाईला (fine from police) सामोरे जावे लागेल. तीन दिवस कडक लॉकडाउन असल्याने जीवनावश्यक वस्तू, साहित्य खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी बाजारपेठेत तोबा गर्दी केली होती. ठिकठिकाणी पोलिस तैनात होते. मात्र, त्यांच्याकडून देखील नागरिकांना साहित्य खरेदी करण्यासाठी मुभा दिल्याचे दिसून आली. कांदा मार्केट, रविवार पेठ, पाटील गल्लीसह विविध ठिकाणी साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. दहानंतर मात्र, पोलिसांनी नेहमीप्रमाणे दुकाने बंद करण्याची सूचना केली.

loading image
go to top