बेळगावात अमित शहा यांच्या स्वागतावरून महिला पदाधिकाऱ्यांत शाब्दीक चकमक

महेश काशीद
Sunday, 17 January 2021

डॉ. सरनोबत यांनी स्वागत यादीत कोणाची नावे होती आणि त्यात कोणी फेरफार केली, याची कल्पना नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 

बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या स्वागत यादीतून नाव कमी करण्यावरून कर्नाटक राज्य पाणी पुरवठा मंडळाच्या संचालिका दिपा कुडची व डॉ. सोनाली सरनोबत यांच्यात आज शाब्दीक चकमक उडाली. श्रीमती कुडची यांनी मुळ राष्ट्रीय स्वयंसेवक व भाजप कार्यकर्त्यांना बाजूला केले जात आहे, अशी टीका केली आहे. डॉ. सरनोबत यांनी स्वागत यादीत कोणाची नावे होती आणि त्यात कोणी फेरफार केली, याची कल्पना नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज सकाळी साडे अकराच्या सुमारास सांबरा विमानतळावर आगमन झाले. पण, यापूर्वी स्वागत समितीचे पदाधिकारी विमानतळाच्या आत आणि स्वागत मार्गावर पोचले. यात सरनोबत यांचे नाव होते. त्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला. पण, दिपा कुडची यांचे नाव यादीमधून वगळण्यात आल्याने त्यांना प्रवेश मिळाला नाही. कुडची व माजी मंत्री शशिकांत नाईक यांना विमानतळावर प्रवेश देण्यात आला नाही. 

हेही वाचा -  ग्रामसभांचे महत्त्व लक्षात घेऊन दिली परवानगी

यासंदर्भात कुडची यांनी प्रतिक्रिया दिली, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पक्षासाठी 20 पेक्षा अधिक वर्षापासून काम करते. पक्षाची निष्ठावत कार्यकर्ते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त स्वागत समिती स्थापली होती. या समितीमध्ये शनिवारी रात्री उशिरापर्यंत माझे नाव होते. पण, रात्री उशिरा अचानक यादीत फेरफार झाला. माझे नाव कमी करून सरनोबत यांचा समाविष्ट झाला आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे.'

यावेळी डॉ. सरनोबत म्हणाल्या, 'केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागत समितीमध्ये माझे नाव होते. यामुळे मी आले. इतरांची नावे त्यात का नव्हती, हे मला माहित नाही. परंतु, माझ्याबाबत कोण (दीपा कुडची) काय बोलले आहे, हे पाहून प्रतिक्रिया देईन. मी नियती फौंडेशनसह विविध संस्थेत सक्रिय आहे. पक्षात सहा ठिकाणी पदाधिकारी असल्याचो उल्लेख केला आहे. त्यात तथ्य नाही आणि त्याविषयाची कल्पना नाही.' 

हेही वाचा - हजारो कार्यकर्त्यांना उद्देशून आज त्यांचे भाषण होणार आहे

 

संपादन - स्नेहल कदम 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on the welcome of amit shah in belgaum women of related office disputes on list name in balgam