खाकी वर्दी सायकलवरती

Welcome to police bicycle rally in nagar
Welcome to police bicycle rally in nagar
Updated on

नगर : राज्य राखीव दलाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत "बेटी बचाओ बेटी पढाओ' आदी सामाजिक संदेश देत राज्य राखीव दलाच्या पथकाने 25 फेब्रुवारी ते पाच मार्च या कालावधीत नागपूर ते पुणे अशी सायकल फेरी काढली आहे. ही फेरी नगर शहरात दाखल झाली. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय चौकात जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे बॅंडपथकासह फेरीचे स्वागत करण्यात आले. नवीन टिळक रस्त्यावरील सरस्वती लॉन येथे विशेष स्वागत कार्यक्रम झाला. आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. 

ही सायकल फेरी पोलिस उपनिरीक्षक प्रफुल्ल खडपकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. या कार्यक्रमाला सहायक समादेशक एस. डी. धुमाळ, पोलिस निरीक्षक आर. जी. शिंदे, पोलिस उपनिरीक्षक पी. एम. नेमाणे, एम. वाय. मोहड, एस. बी. काकडे, सी. डी. गवळी, एम. वाय. मोहोळकर, नगरसेवक मनोज कोतकर, अजिंक्‍य बोरकर, देविदास व प्रतिभा आहेर आदी उपस्थित होते. 

पथकात 120 सायकलस्वार

राज्य राखीव दलाचा सहा मार्चला वर्धापनदिन असतो. या फेरीची संकल्पना अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी यांची, तर समायोजन श्रीकांत पाठक यांचे आहे. या फेरीत राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथकही आहे. त्यानिमित्त "खाकी वर्दी सायकलवरती' हे घोषवाक्‍य घेऊन राज्य राखीव दलाचे जवान निघाले आहेत. सुमारे 900 किलोमीटरची ही सायकल फेरी आहे. या पथकात 120 सायकलस्वार आहेत. काल हे पथक घोडगाव (ता. नेवासे) येथे मुक्‍कामी होते. मंगळवारी (ता.3) सकाळी आठच्या सुमारास ते नगरमध्ये दाखल झाले. 

पुढील पिढीला संदेश देणे महत्त्वाचे : संग्राम जगताप

""राज्य राखीव दलाचा पुण्यात वर्धापनदिन साजरा होणार आहे. विविध कार्यालयांकडून वर्धापनदिनानिमित्त नवीन संकल्पना राबविल्या जातात. काय घडले, यापेक्षा पुढील पिढीला काय देणार, हे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने राज्य राखीव दलाने ही सायकल फेरी काढली आहे, ही कौतुकाची बाब आहे,'' असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com