दंडोबा डोंगर (Dandoba Dongar) रांग ही मोरांचे आश्रयस्थान आहे. इथे मोरांची संख्या प्रचंड आहे. आजवर ती कुणी मोजली नाही, मोजायला ती शक्यही नाही. इतके सारे मोर या भागात आहेत.
Dandoba Dongar : ही काटेरी झुडपे कशासाठी ठेवली आहेत? काढून टाका ती. जागा स्वच्छ करा, दुसरी चांगली झाडे वाला इकडे... जिल्ह्यातील एका नेत्याने दंडोबाच्या डोंगरावर पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना आदेश दिले. अधिकारी म्हणाले, ‘‘ही काटेरी झुडपे साधीसुधी नाहीत. तुम्हाला त्यांचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर तासभर आपण इथे थांबूया का?’’ ते नेते थांबले आणि जरा दिवस मावळू लागला तसे त्या काटेरी झुडपांच्या मागून एकेक कर मोरांचे (Peacock) थवे बाहेर पडू लागले. लांबून नेते, कार्यकर्ते आणि अधिकारी ते दृश्य पाहतच राहिले.