Sangli News : राज्यात द्राक्ष बागांचे नेमके क्षेत्र किती?; द्राक्ष संघ, कृषी विभागाच्या आकडेवारीत तफावत
सांगलीसह पुणे विभागातील द्राक्ष क्षेत्राच्या आकडेवारीतही मोठा गोंधळ असल्याचे समोर आले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांना नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईपासूनही वंचित राहण्याची वेळ येत आहे.
सांगली : जिल्ह्यात द्राक्षपिकाखालील क्षेत्र सव्वा लाख एकर असल्याचे द्राक्षबागायतदार संघाचे म्हणणे आहे; तर कृषी विभागाकडील माहितीत ७७ हजार एकराची नोंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्षपिकाखालील नेमके क्षेत्र किती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.