esakal | व्हाट्सअप दणका; भारतातील ३० लाख खाती बॅन
sakal

बोलून बातमी शोधा

व्हाट्सअप

व्हाट्सअप दणका; भारतातील ३० लाख खाती बॅन

sakal_logo
By
अजित झळके - सकाळ वृत्तसेवा

सांगली : सोशल मिडिया दुधारी तलवार आहे. संवादक्रांती आलीय, मात्र त्यातून प्रश्‍नही तितकेच निर्माण होत आहेत. अशा प्रश्‍नांना उत्तर शोधत पुढे जाण्याची भूमिका या फेसबूक, व्हाट्सअप सारख्या संस्थांनी घेतली आहे. त्यातूनच गेल्या ४६ दिवसांत भारतातील तब्बल ३० लाख वॉटसअप खाती बॅन करण्यात आली आहेत.व्हाट्सअपने आज हा दुसरा अहवाल जारी केला असून बहुतांश वापरकर्त्यांनी या कारवाईची माहिती त्यांच्या ई-मेलवर देण्यात आली आहे. वाचाळवीरांना हा दणका मानला जातोय.

हेही वाचा: यंदा जिल्ह्यातील 1800 होमगार्ड गणेशोत्सवावर बहिष्कार टाकणार?

माहिती तंत्रज्ञान कायदा -२०२१च्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या खात्यांबद्दल तक्रारीचा ‘रिपोर्ट’ करण्यात आला, त्याची शहानिशा करून ही खाती बॅन करण्यात आली आहेत. ‘आम्ही आमच्या ग्राहकांना अधिक सुरक्षित सेवा देण्यास बांधिल आहोत, त्या दृष्टीने खूप काम सुरु आहे. चूकीच्या गोष्टी होत असतील तर योग्य ती कारवाई केली जाईल’, असेही त्यांच्या प्रवक्त्याने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तब्बल ३० लाख २७ हजार खाती बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे विविध पद्धतीने इतर वापरकर्त्यांना त्रास होईल असे संदेश पाठवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दणका देण्यात आला आहे.

loading image
go to top