esakal | यंदा जिल्ह्यातील 1800 होमगार्ड गणेशोत्सवावर बहिष्कार टाकणार?
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा जिल्ह्यातील 1800 होमगार्ड गणेशोत्सवावर बहिष्कार टाकणार?

गणेशोत्सवातील बंदोबस्तावर होमगार्ड बहिष्कार टाकल्यास पोलिसांवर ताण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदा जिल्ह्यातील 1800 होमगार्ड गणेशोत्सवावर बहिष्कार टाकणार?

sakal_logo
By
ऋषिकेश राऊत

इचलकरंजी (कोल्हापूर) : जिल्ह्यातील सर्व पात्र व अपात्र असे 1हजार 800 होमगार्ड येणाऱ्या गणेशोत्सव बंदोबस्तावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. दोन दिवसांपूर्वी इचलकरंजी शहरातील तीन पोलिस ठाण्यात गोकुळाष्टमीच्या बंदोबस्तासाठी सुमारे 50 होमगार्डना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतके होमगार्ड बंदोबस्तासाठी उपस्थित राहिले. यावरून होमगार्डसची नाराजी स्पष्टपणे दिसून आली. त्यामुळे गणेशोत्सवातील बंदोबस्तावर होमगार्ड बहिष्कार टाकल्यास पोलिसांवर ताण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या तीन वर्षापासून विविध मागण्यांसाठी होमगार्डसचा लढा सुरू आहे. 2018 साली पहिल्यांदा होमगार्ड मंडळीनी गणेशोत्सव बंदोबस्तावर टाकला होता. आता पुन्हा यावर्षीच्या गणेशोत्सव बंदोबस्तावर बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत आहेत.संपूर्ण 365 दिवस काम असावे, सेवेतून बाद केलेल्या होमगार्ड यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेणे, वयोमर्यादा 65 करणे, शासकीय भरती किमान दहा टक्के आरक्षण द्यावे अशा मागण्यांसाठी बहिष्काराचे अस्त्र उचलले आहे.

हेही वाचा: रंगकर्मींसाठी खुशखबर! नाटकाची तिसरी घंटा नोव्हेंबरला वाजणार

दोन दिवसांपूर्वी गोकुळाष्टमी पार पडली. यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शहरात 50 हुन अधिक होमगार्डसना बंदोबस्तासाठी हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतके होमगार्ड हजर राहिले. यावरूनच होमगार्ड गणेशोत्सवातही बहिष्कार टाकतील, अशी भीती पोलीस प्रशासनाला आहे.

गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, निवडणुका, मंत्र्यांचे दौरे, जाहीर सभा आधी कार्यक्रमात पोलिसांइतके बंदोबस्ताचे काम होमगार्ड यांनाही करावे लागते. आता प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने नऊ दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवातील बंदोबस्तावर होमगार्ड बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळी पोलिसांवर कामाचा ताण वाढणार आहे.आधीच तपास आणि गस्तीसाठी पोलीस बळ अपुरे पडत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात होमगार्डअभावी पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण वाढल्यास कायदा व सुव्यवस्था प्रभावित होऊ शकते.

हेही वाचा: 'सोमय्यांचे ब्लॅकमेलिंग, राणेंच्या ED चौकशीचं पुढं काय?'

राज्यशासनाच्या निर्णयाकडे लक्ष

प्रलंबित मागण्यांसाठी होमगार्डसनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. तो मोर्चा रोखत गृहराज्यमंत्र्यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने होमगार्ड गणेशोत्सवाचा बंदोबस्त बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी शासन काय निर्णय घेणार याकडे पोलिस व होमगार्डचे लक्ष लागले आहे.

"गणेशोत्सवापर्यंत होमगार्डबाबत सकारात्मक निर्णय होईल. बंदोबस्तासाठी होमगार्डसची अत्यंत गरज असते. या दृष्टीकोनातून योग्य भूमिका शासन घेईल आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी हजर राहतील."

- सौ. जयश्री गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक

हेही वाचा: 'अनिल परबांचे बांधकाम वाचवून दाखवाच!'

loading image
go to top