शाळा सुरू झाल्यास सर्व शिक्षकांची होणार कोविड चाचणी

मिलींद देसाई
Friday, 9 October 2020

सरकारी, अनुदानित व विना अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांची कोविड चाचणी करण्याची सुचना करण्यात आली आहे. 

बेळगाव : कोरोनाचे संकट असले तरी शाळा सुरु करण्यास अधिकचा वेळ होऊ नये यासाठी सरकारकडुन, विविध प्रकारचा विचार विनिमय सुरु आहे. त्यामुळे शाळा कधी पासुन आणि कोणत्या प्रकारे सुरु कराव्यात याचा निर्णय येणाऱ्या दिवसात घेण्यात येणार असुन शाळांना सुरुवात होण्यापुर्वी सर्व शिक्षकांना कोविड 19 ची चाचणी करुन घ्यावी लागेल याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्याबाबत शिक्षकांमधुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटु लागल्या आहेत. 

हेही वाचा - तरूणांनो सावधान! 2200 रुपयांत फिल्ड ऑफिसरची नियुक्ती पत्रे 

29 मेपासुन सुरु होणारे शैक्षणिक वर्ष कधीपासुन सुरु होईल याबाबत अजुनही अंतीम निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र बालहक्‍क आयोगाने शाळा सुरु कराव्यात अशी शिफारस सरकारला केली आहे. त्यामुळे शाळा सुरु होण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. तसेच शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी काही सुचना केल्या जात आहेत. यामध्ये सरकारी, अनुदानित व विना अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांची कोविड चाचणी करण्याची सुचना करण्यात आली आहे. 

शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यागम योजना हाती घेतली. या योजनेमुळे अभ्यासापासुन दुर असलेले विद्यार्थी पुन्हा एकदा अभ्यासाकडे वळले आहेत. मात्र राज्याच्या काही भागात विद्यागम अंतर्गत शिक्षण उपलब्ध करुन देत असताना काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन झाल्याचे दिसून आले. त्यामुळे खबरदारी म्हणुन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सर्व शिक्षकांना कोविडची चाचणी करुन घ्यावी लागणार आहे. 
शिक्षकांची कोविड चाचणी करण्याची चर्चा सुरु झाल्यानंतर काही शिक्षकांनी निर्णयाचे स्वागत केले. तर अनेकांनी शिक्षकांनी सरसकट कोविड चाचणी करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्‍त होत आहे. 

हेही वाचा - बेळगावात  50 वर्षांची शारदोत्सवाची परंपरा खंडित 

"शाळा सुरु करण्यापुर्वी सर्व प्रकारची काळजी घेणे आवश्‍यक असुन शिक्षकांची कोविड 19 ची तपासणी करण्याचा निर्णय योग्य आहे. सध्या विद्यागम योजनेचा विद्यार्थ्यांना चांगला लाभ मिळत आहे. येणाऱ्या काळात शिक्षण खात्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे." 

- जयकुमार हेबळी, अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघटना

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when government start a school the teachers also test of corona are compulsory in belgaum