esakal | Sangli : निर्णय कधी?; मंडळांचे कार्यकर्ते संभ्रमात
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

निर्णय कधी?; मंडळांचे कार्यकर्ते संभ्रमात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर : नवरात्र उत्सवासाठीचा शासनाचा निर्णय अजूनही जाहीर न झाल्याने सार्वजनिक नवरात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्यात मूर्ती स्थापनेबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. निर्बंध शिथिल होऊन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होईल या आशेने मूर्तिकारांनी धाडसाने मूर्ती तयार करण्याचे काम सुरू ठेवले आहे.

अवघ्या सात दिवसांवर घटस्थापना आल्याने ग्रामीण व शहरी भागात दुर्गादेवीची स्थापना करण्यासाठी कार्यकर्त्यांच्यात आतुरता निर्माण झाली आहे. कोरोना नियमावलीत शिथिलता झाली आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. त्यामुळे लोकांच्यात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. गतवर्षी कोरोनामुळे सर्वत्र मूर्ती स्थापनेला बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांत निराशा होती; परंतु या वर्षी तरी नवरात्र उत्सवाचा दांडिया घुमणार का, असा सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे. मूर्ती कारागीरसुद्धा मोठ्या आशेने धाडस करून दुर्गामातेच्या मूर्ती करण्यात व्यग्र आहेत. मंडळांनी मूर्तीची अचानक मागणी केल्यास मूर्ती देणे शक्य होत नाही. त्यासाठी दोन महिन्यांपासून कारागीर मूर्ती तयार करीत आहेत.

राज्य शासनाने दुर्गामाता मूर्ती स्थापनेबाबत अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अद्याप काहीही निर्णय दिलेला नाही. मागील वर्षीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मूर्ती स्थापना करता येणार नाही. खासगी जागेत दहा बाय दहा फूट जागेतच स्थापना करता येईल.

- विजय घोरपडे,

नवरात्र मंडळ, इस्लामपूर

दुर्गामाता मूर्ती स्थापनेबाबत प्रशासनाने नियम व अटी घालून लवकरात लवकर निर्णय जाहीर करणे गरजेचे आहे. सार्वजनिक मंडळांची द्विधावस्था असल्याने मूर्तीची मागणी झालेली नाही. तरीसुद्धा आम्ही धाडसाने भांडवलाची जुळवाजुळव करून मूर्ती तयार करण्याचे काम करीत आहोत. सरासरी दोन फुटांपासून पाच फुटांपर्यंत मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे.

- सचिन चौधरी, मूर्ती कारागीर, इस्लामपूर

loading image
go to top