
Vasantdada Patil Village : श्रीमती जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे मूळगाव असलेल्या पद्माळेमध्ये प्रथमच भाजपची ताकद वाढली आहे. पद्माळे ग्रामपंचायतमध्ये मदनभाऊ गटाचे सरपंच असून, उपसरपंच भाजपचे होते. नुकत्याच झालेल्या विकास सोसायटीच्या निवडणुकीतही मदनभाऊ गटाने सत्ता मिळवली आहे. हा गट चार दिवसांपूर्वी भाजपवासी झाल्यामुळे वसंतदादांच्या गावात आता भाजपचे वर्चस्व आहे.