video बिबट्या कोणी मारीला? 

सनी सोनावळे 
गुरुवार, 16 जानेवारी 2020

रांधे (सज्जनवाडी) या परिसरामध्ये प्रमोद आवारी यांना एक बिबट्या आजारी अवस्थेत आढळला. त्या बिबट्याला माणिकडोह (जुन्नर) येथील उपचार केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथे त्या बिबट्याचा मुत्यू झाला.

टाकळी ढोकेश्वर, (ता. पारनेर) ः पारनेर तालुक्‍यात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. काही महिन्यांपूर्वी तेथील ग्रामस्थांनी बिबट्याची टोळीच पाहिली होती. या टोळीने निघोज परिसरातील एका महिलेवर हल्ला केला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे या भागातील शेतकरी रात्री घराबाहेर पडण्यासही घाबरतात.

बिबट्याच्या दहशतीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. काही टवाळखोरांनी तर या परिसरात वाघ असल्याचे व्हिडिओ फिरवले होते. त्यावर वन विभागाने या परिसरात वाघ नसल्याचे स्पष्ट केले. बिबट्याबाबत दर पंधरा दिवसांनी काही तरी अफवा पसरतातच. वन विभागाने अनेका त्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले. मात्र, त्याचा काही उपयोग होऊ शकला नाही. 

विष प्रयोगाची शक्‍यता 
वन विभाग बिबट्यांचा बंदोबस्त करीत नसल्याने काहीजण वन्य प्राण्यांचा आपापल्या परीने बंदोबस्त करतात. हे अनेकदा समोर आले आहे. काहीजण वीजेचा प्रवाह सोडतात, काहीजण विष कालवतात. त्यातून वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागतो. 

हेही वाचा- मैला फिल्टरायझेशन प्रकल्प कार्यान्वित 

 

रांधे (सज्जनवाडी) या परिसरामध्ये प्रमोद आवारी यांना एक बिबट्या आजारी अवस्थेत आढळला. त्या बिबट्याला माणिकडोह (जुन्नर) येथील उपचार केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथे त्या बिबट्याचा मुत्यू झाला. त्याचा अळकुटी येथे शवच्छिेदन करून त्याला अळकुटी वनक्षेत्राच्या हद्दीत जाळण्यात आले. 
रांधे (सज्जनवाडी) परिसरात शेतकरी प्रमोद आवारी यांना एका झाडाच्या बुंद्याला कुत्रे भुंकत असल्याचे दिसले. त्यावेळी त्यांना एका बिबट्या आढळला. तो एकदम कृश होता. त्यांनी या बाबतची कल्पना ग्रामस्थांना दिली. वन विभागाला बिबट्याबाबत कळविण्यात आले. वन विभागाने जुन्नर माणिकडोह येथील सेक्‍यू टीमचे डॉ. अजित देशमुख यांना संपर्क केला. 

ठळक बातमी- कर्जमाफी प्रक्रियेत ही बॅंक आघाडीवर

पारनेरचा वन विभाग व जुन्नर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी बिबट्याला उपचारासाठी (जुन्नर ) माणिकडोह उपचार केंद्रात नेले. तेथे उपचारादरम्यान बिबट्याचा मुत्यू झाला. मुत्यूपश्‍चात बिबट्याला अळकुटी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. 

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत भोर यांनी वन विभागाचे वनरक्षक गजानन वाघमारे, डॉ. प्रफुल्ल चाळक, यू. पी. खराडे, नजीर शेख, रवी दवे, भास्कर भंडारी, प्रकाश शिंदे यांच्या समक्ष शवच्छिेदन केले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला वन विभागाच्या हद्दीत नेऊन त्याच्या अंत्यसंस्कार केले. 

शवच्छिेदनानंतर होईल स्पष्ट 
मृत बिबट्याचे शवच्छिेदन करण्यात आले आहे. तो अहवाल आल्यानंतरच बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाला की त्यावर विषप्रयोग करण्यात आला, हे स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे त्या बिबट्याची गेल्या काही दिवसांपासून उपासमार होत होती. अन्न न मिळाल्यानेच तो कृश झाला, असावा असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who killed the leopard