Why Ajit Pawar thanks Karjat-Jamkhedkar
Why Ajit Pawar thanks Karjat-Jamkhedkar

अजित पवार यांनी का मानले कर्जत-जामखेडकरांचे आभार

Published on

कर्जत ः विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघात आले होते. त्यांनी इथे येऊन काही घोषणाही केल्या. या मतदारसंघातील लोकांचे त्यांनी तोंडभरून कौतुकही केलं.

राज्यात आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे कोणाला घाबरण्याचं कारण नाही. कोणाच्या सांगावांगीवर विश्वास ठेवून वेगळं पाऊल उचलू नका. केंद्र सरकारच्या सीएए, एनपीआरचा राज्यातील लोकांना त्रास होऊ देणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार लोकांसाठी काम करणारं आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला आश्वस्त केलं.

कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे आयोजित कार्यक्रम ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याह मंत्रीमंडळ उपस्थित होते.

शेतकर्यांसाठी ३५ हजार कोटी

महाविकास आघाडीच्या सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. दोन लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकर्यानाही लाभ मिळणार आहे. नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांनाही दिलासा दिला आहे. तिन्ही घटकांत मिळून ३५ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. राज्याकडे कर रूपाने जमा होणारा हा पैसा आहे. त्याचा निश्चितच तिजोरीवर ताण पडणार आहे. असे असले तरी शेतकर्यांसाठी नवीन कर्जही उपलब्ध करून दिलं पाहिजे. िजल्हा सहकारी बँक नक्कीच हे काम करील, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

यंदा चांगलं काम केलंत.

कर्जत-जामखेडच्या लोकांनी यंदाच्या निवडणुकीत चांगलं काम केलं आहे. रोहित हा विकासाचा दृष्टिकोन असलेला तरूण आमदार आहे. तो नक्की विकास करील. तुम्ही लोकांनीही कोणतेही पक्षीय राजकारण आणले नाही पाहिजे. त्याला निवडून दिल्याने मी तुमचे आभार मानतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com