भाजपने विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादीला केले बहाल, का? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते संपत बारस्कर यांना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज दुपारी विरोधीपक्ष नेतेपदाचे पत्र दिले. संख्याबळानुसार महापालिकेत शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. मात्र, तरीही हे पद शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीला बहाल करण्यात आले आहे. 

नगर ः राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस अशी महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटले आहेत. मात्र, महापालिकेत वेगळे चित्र पाहायला मिळाले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते संपत बारस्कर यांना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज दुपारी विरोधीपक्ष नेतेपदाचे पत्र दिले. संख्याबळानुसार महापालिकेत शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. मात्र, तरीही हे पद शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीला बहाल करण्यात आले आहे. 
महापालिकेत राष्ट्रवादीने सत्तास्थापनेवेळी भाजपला पूरक भूमिका घेतली होती. त्यामुळेच भाजपनेही अशी परतफेड केल्याची चर्चा शहरात आहे. या भाजपच्या या भूमिकेवर शिवसेना काय, पवित्रा घेतेयाकडे महापालिका वर्तुळाकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - शेवगावात पडतोय कॉप्यांचा पाऊस, बघा व्हिडिअो 

यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप, उपमहापौर मालन ढोणे, सभागृह नेता स्वप्निल शिंदे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, नगरसेवक कुमार वाकळे, दीपाली बारस्कर, पल्लवी जाधव, रवींद्र बारस्कर, सागर बोरूडे, निखील वारे, अमोल गाडे, समद खान, मनोज कोतकर, सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, संजय चोपडा आदी उपस्थित होते. 

यावेळी संपत बारस्कर पुढे म्हणाले की, नगर शहराच्या विकासासाठी सत्ताधारी व प्रशासनावर अंकुश ठेवणार आहे. शहरातील प्रलंबित प्रश्‍नांसाठी विरोधी नेत्याची भूमिका सक्षमपणे पार पाडणार आहे. आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये आम्ही काम करीत आहोत.

नगर शहराच्या विकासासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना सहकार्य करणार आहोत. परंतु चुकीच्या कामाला पाठीशी घालणार नाही. सर्वांना बरोबर घेवून मनपाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी मोठा निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why BJP resigns as Leader of Opposition to Ncp, why?