ज्योतिरादित्य सिंदिया यांनी विद्यार्थी दशेत का केली नोकरी ?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

अमेरिकेतील हाॅर्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होतो. सुटीला मी दिल्लीत आल्यानंतर क्रिकेट खेळायचो. आई चांगले पदार्थ खायला द्यायची. सुटी संपल्यानंतर अमेरिकेत गेलो.‌ सर्व मित्र एकत्र बसलो. त्यावेळी परदेशातील विद्यार्थ्यांनी सुटीत वेगवेगळी काम केल्याचे लक्षात आले. मला मात्र काहीच सांगता आले नाही. त्यानंतर सुटीला भारतात परत न येता काम करण्याचा संकल्प केला. बँकिंग क्षेत्रात नोकरी केली, श्री. सिंदिया यांनी सांगितले.

कोल्हापूर - तरुणांनो, उठा जागे व्हा. कोल्हापूरच्या नवनिर्मितीसाठी पुढाकार घ्या, असे आवाहन काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंदिया यांनी आज येथे केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्षांच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित 'यूथ कनेक्ट' उपक्रमात ते बोलत होते. या वेळी कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी निवडणुकीसाठी तयार केलेल्या 'मिशन रोजगार' जाहीरनाम्याचे त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. 

आमदार सतेज पाटील, संजय डी. पाटील, प्रतिमा पाटील, बाजीराव खाडे यांची उपस्थिती होती. हाॅटेल सयाजीमध्ये हा कार्यक्रम झाला.

श्री. सिंदिया म्हणाले, " तरुणाई इतिहास रचणारी असते. तुमच्या हृदयात भिती, चिंता नसून उत्सुकता आहे. जीवनात परिवर्तनाचा संकल्प करण्याची धमक आहे. जनसेवा, प्रगती, विकास हे तुमचे भविष्य आहे. वर्तमानाच्या चौकटीवर तुम्ही उभे आहात. उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी इतिहास जागृत ठेवावा लागेल."

ते म्हणाले, " शिवरायांचा इतिहास देशासाठी गौरवशाली आहे. तो धर्मनिरपेक्षतेचा व भविष्याच्या निर्मितीचा इतिहास आहे. साहस, सत्याची जाणीव, कुटनितीने शत्रूला हैराण करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा इतिहास प्रेरणा देणारा आहे. पण चौथीच्या पुस्तकातील छत्रपती शिवरायांचा इतिहास पुसण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहे." 

कोल्हापूरकरांनो, वेगमर्यादेचे उल्लंघन कराल तर अडचणीत याल 

आज देशातील तरुणांना रोजगार हवा आहे. त्यासाठी शिक्षणाबरोबर अनुभव महत्त्वाचा आहे. नुसत्या चांगल्या कल्पना असून चालत नाही. त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. पण आमदार झाल्यानंतर त्याचे अजेंड्यानुसार काम सुरू आहे की नाही, याची पाहणी तरुणाईने करायला हवी."

- ज्योतिरादित्य सिंदिया

सिंदियांनी विद्यार्थी दशेत सुटी कालावधीत बँकेत केली नोकरी

अमेरिकेतील हाॅर्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होतो. सुटीला मी दिल्लीत आल्यानंतर क्रिकेट खेळायचो. आई चांगले पदार्थ खायला द्यायची. सुटी संपल्यानंतर अमेरिकेत गेलो.‌ सर्व मित्र एकत्र बसलो. त्यावेळी परदेशातील विद्यार्थ्यांनी सुटीत वेगवेगळी काम केल्याचे लक्षात आले. मला मात्र काहीच सांगता आले नाही. त्यानंतर सुटीला भारतात परत न येता काम करण्याचा संकल्प केला. बँकिंग क्षेत्रात नोकरी केली, श्री. सिंदिया यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why did Jyotiraditya Scindia do job in his student life