esakal | विधवा महिलेवरील अत्याचार प्रकरण : एकावर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime

विधवा महिलेवरील अत्याचार प्रकरण : एकावर गुन्हा दाखल

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव : पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावातील एका विधवा महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शुक्रवार (१) काकती पोलिस ठाण्यात पीडितीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अत्याचार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. हिंडलगापासून जवळच असलेली एका गावातील विधवा महिलेवर ९ आगस्ट २०२१ रोजी पहाटे ४ च्या सुमारास एकाने अत्याचार केला आहे. पीडित विधवा महिला शिक्षिका आहे. अत्याचार झालेल्या तब्बल २ महिन्यानंतर पीडित महिलेने या प्रकरणी काल काकती पोलिस ठाण्यात संबाधित नराधमाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास सुरु केला आहे.

loading image
go to top