पत्नीनेच काढला प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Laxmi Jutgannawar and Ramesh Badiger

होसुर (ता. रामदुर्ग) येथे घडलेल्या खून प्रकरणाचा चोवीस तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

पत्नीनेच काढला प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा

बेळगाव - होसुर (ता. रामदुर्ग) येथे घडलेल्या खून प्रकरणाचा चोवीस तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी कटकोळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पांडप्पा दुंडाप्पा जुटगण्णावर (वय ३५) असे मयताचे नाव आहे.

पोलिसांनी या प्रकरणी पत्नी लक्ष्मी आणि तिचा प्रियकर रमेश बडीगेर याला अटक केली आहे. २४ तासात खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पांडप्पाचा खून करून मृतदेह रामदुर्ग तालुक्यातील होसुर गावातील पुलावर फेकून देण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणी कटकोळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून अवघ्या २४ तासात वरील दोघा संशयीतानान अटक केली. प्रिकराच्या मदतीने पतीचा खून केल्यानंतर त्याच्याच मोटरसायकलवरून होसुर पुलानजिक फेकून दिला. आपणाला काहीच माहिती नसल्यासारखे खूनाच्या त्या दिवशी पत्नी लक्ष्मी घरी पोहचली. दुसरे दिवशी पती घरी परतला नसल्याचे नाटक केले.

मात्र, पत्नीची पोलिसांनी कसून चौकशी केल्या असता खरे सत्य बाहेर आले. लक्ष्मीचे गावातील रमेश बडिगेर त्याच्याबरोबर सलगी झाली होती. त्यामुळे याची कुणकुण पती पांडप्पाला लागली होती. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. याच कारणातून पतीचा कायमचा काटा काढण्याची तिने ठरविले. खूनाच्या त्या दिवशी पांडप्पा आणि लक्ष्मी यांच्यामध्ये भांडण झाले होते. ही माहिती लक्ष्मीने प्रियकर रमेशला दिली. आणि खूनाचा कट रचला. त्याचवेळी रमेश त्या ठिकाणी आल्याने पांडप्पा बरोबर त्याचे जोरदार भांडण झाले. त्यावेळी पांडप्पाच्या डोकीत कृषी अवजाराने डोकीत वार करून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह मोटरसायकलला बांधून फेकून देण्यात आला. हा खून नसून अपघात भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी कसून तपास केल्याने पत्नीनेच पतीचा काटा काढल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

Web Title: Wife And Her Lover Murder To Husband Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..