
देवराष्ट्रे : सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या कुंपणा- शेजारी चार हरणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हरणांचा मृत्यू होऊन काही दिवस उलटले नाही, तोवर एकाच दिवशी चार हरणे मृत सापडल्याने वन्यजीव विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सातत्याने होणारे हरणांच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.