280 कोटींच्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

Will Chief Minister Uddhav Thackeray Takes Decision About Karad City Propsal
Will Chief Minister Uddhav Thackeray Takes Decision About Karad City Propsal

कऱ्हाड : राज्यात भाजपची सत्ता असताना शहरातील विकासकामांसाठी पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध विकासकामांचा 280 कोटींचा प्रस्ताव सादर केला. त्यासाठी पालिकेतील 22 पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केला. मात्र, राज्यात सत्ता बदलून कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पालिकेच्या प्रस्तावाला "ग्रीन सिग्नल' मिळणार का? याकडे सर्वांची लक्ष लागले आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 
 
पालिकेत सध्या यशवंत जनशक्ती विकास आघाडीची सत्ता आहे. नगराध्यक्षपदावर भाजपच्या उमेदवार थेट जनतेतून निवडून आल्या आहेत. विरोधी बाकावर आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी आहे. जनशक्ती आघाडी निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाजूने रिंगणात होती. नगराध्यक्षांसह काही ठराविक जागांवर भाजपने उमेदवार रिंगणात उतरवले होते. "लोकाशाही'ने सगळ्याच जागा लढविल्या. त्यात यशवंत जनशक्तीला नागरिकांनी बहुमताचा कौल दिला.

हेही वाचा : साताऱ्याच्या हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अवलंबून 

नगराध्यक्षपद भाजपच्याच वाट्यात टाकत चार नगरसेवकही विजयी झाले. लोकशाही आघाडी ठराविक जागांवर विजयी झाली. त्यामुळे भाजपची अल्पमतात सत्ता, यशवंत आघाडीला बहुमत, तर लोकशाही आघाडी विरोधी बाकावर असे चित्र पालिकेत झाले. कालांतराने आमदार चव्हाण यांच्यापासून यशवंत आघाडीने फारकत घेतली. तीन वर्षांच्या काळात पालिकेतील यशवंत जनशक्ती आघाडीने भाजपशी जुळवून घेऊन कारभार सुरू केला. पालिकेने 280 कोटींच्या विकासकामांचा प्रस्ताव पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केला. 

हेही वाचा - #MondayMotivation एकीचे बळ 

विकासकामे होणार असल्याने भाजपबरोबर राहण्याचा "यशवंत जनशक्ती'चा सिलसिला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहिला. पालिकेतील "यशवंत जनशक्ती'च्या 22 नगरसेवकांनी भाजपचे अतुल भोसले यांचे काम केले. मात्र, कऱ्हाड दक्षिणेत माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण निवडून आले. सध्या राज्यात सत्ता बदल झाल्याने पालिकेच्या 280 कोटींच्या विकासकामांच्या प्रस्तावाचे होणार काय, असा प्रश्न पालिकेतील पदाधिकाऱ्यांना पडला आहे. 

दोन्ही आमदारांवर भिस्त 

पालिकेतील राजकीय हालचालींचा प्रस्ताव मंजुरीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. सत्ताधारी यशवंत जनशक्ती आघाडी भाजपच्या बाजूने आहे. कऱ्हाडचे स्थानिक आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधातील सत्ता पालिकेत आहे. कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी विरोधी गट म्हणून पालिकेत कार्यरत आहे. त्यामुळे प्रस्ताव मंजुरी करताना दोन्ही आमदारांना विचारात घेतले जाईल. त्यामुळे त्यांचाही निर्णय महत्त्वाचा आहे. 


प्रस्तावातील विविध विकासकामे 

* शहरातील पार्किंगचा प्रश्न 
* कृष्णा नदी संरक्षक भिंत, वॉकिंग ट्रक 
* शहरातील 51 रस्त्यांसाठी अनुदान 
* चौकातील सुशोभीकरणाची कामे 
* ड्रेनेजच्या कामासाठीची निधी 
* वाढीव हद्दीतील विकासकामे 
* सोलर सिस्टीमची कार्यवाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com