"ते' दिव्यांगांसाठी निधी संकलन करणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 एप्रिल 2020

लॉकडाउनच्या काळात दिव्यांग व्यक्तींचा अवस्था बिटक झाली आहे. दिव्यांगासमोर आर्थिक अडचणींचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी संकलन करून दिव्यांगांना देण्याचा मानस दाखविला. त्याला जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभापती उमेश परहर यांनी ही संकल्पना मांडली. 

नगर:  लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख दिव्यांगांना आर्थिक मदतीसाठी समाजकल्याण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मर्यादित निधीमुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने दिव्यांगांच्या मदतीसाठी दिव्यांग सहाय्यता निधी संकलित करण्याची संकल्पना समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी मांडली. त्यास सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

आवश्‍यक वाचा नगरच्या महिलेचा जळगावमध्ये राडा 

समाजकल्याण विभागाला दिव्यांगांच्या विविध उपाययोजनांसाठी सेसमधून सुमारे 90 लाखांचा निधी येणार आहे. लॉकडाउनमुळे दिव्यांगही घरात बसून असल्याने, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य जालिंदर वाकचौरे यांच्यासह इतर सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, 90 लाखांचा निधी अपुरा असल्याने सर्वांना मदत मिळणे अवघड आहे. 

हेही वाचा एका क्‍लिवर भरा मालमत्ता कर 

जिल्हा नियोजनमधून दिव्यांगांसाठी पाच टक्के आणखी निधी आल्यास सर्वांना मदत मिळू शकेल. हा विषय समाजकल्याणचे सभापती परहर यांनी बैठकीत मांडला असता, सर्वांनी त्यास मंजुरी दिली. अशा निधीसंकलनासाठी शासनाची मंजुरी गरजेची आहे. लवकरच पालकमंत्री हसन मुश्रीफ नगर दौऱ्यावर येत असून, त्यांच्याशी चर्चा करून या प्रस्तावास मंजुरी घेण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हा नियोजनमधून आरोग्य विभागाला निधी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी दिल्यास, सर्वांना आर्थिक मदत करता येईल. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार आहोत, असे परहर म्हणाले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will raise funds for the disabled