esakal | बेळगाव लोकसभेत कॉंग्रेस चितपट; भाजपच्या मंगला अंगडी ठरल्या पहिल्या महिला खासदार

बोलून बातमी शोधा

null
बेळगाव लोकसभेत कॉंग्रेस चितपट; भाजपच्या मंगला अंगडी ठरल्या पहिल्या महिला खासदार
sakal_logo
By
महेश काशिद

बेळगाव : बेळगाव (Belgaum) लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविलेल्या भाजप (BJP) उमेदवार मंगल अंगडी (Mangla Angadi) या राज्यातील चौदाव्या महिला खासदार (MLA) ठरल्या. श्रीमती अंगडी या बेळगावच्या पहिल्या महिला खासदार आहेत. तर राज्यातील त्या चौदाव्या खासदार आहेत. १७ लोकसभा निवडणूक झाल्या असून, यामध्ये कॉंग्रेसच्या (Congress) उमेदवारीवर नऊ महिला निवडून आल्या आहेत. तीन भाजप, एक धजद आणि एक अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाल्या आहेत.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील अटीतटीच्या लढतीत भाजप उमेदवार मंगल अंगडी यांनी बाजी मारली. प्रतिस्पर्धी कॉंग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांचा ५ हजार २४० मताधिक्यांनी पराभव (Looes Election) करत विजय नोंदविला. त्या बेळगावच्या पहिला महिला खासदार होण्याचा मान मिळविला. यामुळे विजय ऐतिहासिक ठरला आहे.

हेही वाचा: पाचव्या फेरीतही विरोधकांची घोडदौड सुरूच

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत उडपी चिक्कमंगळूर येथून शोभा करंदलाजे विजयी झाल्या. मंड्यातून सोमलता अंबरिश यांनी बाजी मारली. आता मंगला अंगडी विजयी झाल्या आहेत. यामुळे राज्यात तीन महिला खासदार आहेत. यापूर्वी कॉंग्रेस पक्षातर्फे नऊ, भाजपकडून तीन, जनता दल आणि अपक्ष म्हणून महिला खासदार निवडून आले आहेत. १९६२ मध्ये धारवाड उत्तरला सरोजनी महर्षी विजयी झाल्या. त्या राज्यामधील पहिल्या महिला खासदार होत्या. त्या दोनवेळा खासदार होत्या. चिक्कमंगळूर (Chikk Mangrul) येथून दिवंगत इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी निवणूक लढवून जिंकली आहे.

१३ व्या लोकसभा निवडणुकीत कारवारमधून मार्गारेट अल्वा यांनी विजय नोंदविला आहे. तसेच कर्नाटकातून सुधा रेड्डी (मधुगिरी), बसवराजेश्‍वरी (बळ्ळारी), डी. के. तारादेवी (चिक्कमंगळूर), रत्नमाला सावनूर (चिक्कोडी), मार्गारेट आल्वा (कारवार), तेजस्वीनी गौडा (कनकपूर), मनोरमा मध्वराज (उडपी), जे. शांता (बळ्ळारी), अभिनेत्री रम्या (मंड्या) यांनी विजय मिळविला. १६ व्या लोकसभा निवडणुकीत मंड्या-चिक्कमंगळूर येथून शोभा करंदलाजे यांनी विजयी मिळविला आहे. २०१९ मध्ये झालेल्या १७ व्या लोकसभा निवडणुकीतही त्या विजयी झाल्या आहेत. यामुळे १४ महिला आतापर्यंत खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

चौघे केंद्रीय मंत्री

आतापर्यंत निवडून आलेल्या १४ महिला खासदारांपैकी चौघा महिलांना मंत्रीपदी बढती मिळाली आहे. यामध्ये बसवराजेश्‍वरी, डी. के. तारादेवी, रत्नमाला डी. सवनूर आणि मार्गारेट आल्वा यांचा समावेश आहे. यामुळे महिला खासदार म्हणून निवडून येणे आणि मंत्रीपद मिळविणे हे महिला खासदारांसाठी आव्हानात्मक ठरले आहे.

हेही वाचा: 'बेड शेवटपर्यत मिळाला नाही, माझा भाऊ गेला'

पक्षनिहाय महिला खासदार

  • पक्ष संख्या

  • कॉंग्रेस ९

  • भाजप ३

  • धजद १

  • अपक्ष १