esakal | 'बेड शेवटपर्यत मिळाला नाही, माझा भाऊ गेला'

बोलून बातमी शोधा

actress pia bajpiee
'बेड शेवटपर्यत मिळाला नाही, माझा भाऊ गेला'
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा संकट अधिक दाट होताना दिसत आहे. रुग्णांना वेळेवर बेड मिळत नाहीत. ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा आहे. अशावेळी त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. यापूर्वी बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींनी त्यांना कोरोनाच्या ज्या समस्यांचा सामना करावा लागला त्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. थोड्या वेळापूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल निक्की तांबोळीनं आपला भाऊ गेल्याची बातमी शेअर केली आहे. त्यानंतर दुसरी अभिनेत्रीनंही आपल्या भावाला कोणत्या त्रासातून जावं लागलं याविषयी सांगितले आहे.

अभिनेत्री पिया बाजपेयीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यात तिनं आपल्या कोरोना झालेल्या भावासाठी बेडची मागणी केली होती. तिनं सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करुन नेते तेजिंदर बग्गा यांच्याकडे मदत मागितली होती. मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. अखेर तिला तिच्या भावाला गमवावे लागले आहे. कोरोनाशी लढता लढता माझ्या भावाचा मृत्यु झाल्याचे पियानं सांगितले आहे.

4 मे ला पियानं व्टिट केले आहे. त्यात तिनं तिच्या भावाचे निधन झाल्याचे सांगितले आहे. त्याच्या अगोदर एका पोस्टमध्ये तिनं भावासाठी व्हेंटिलेटर हवं असल्याचे सांगितले होते. माझा भाऊ राहिला नाही. पियानं एकाहून अधिक व्टिट करुन भावासाठी मदत मागितली होती. पियानं लिहिलं होतं की, उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील कायमगंज या भागातील एका रुग्णालयात व्हेंटिलेटर बेडची गरज आहे. काही माहिती असल्यास सांगा. असे आवाहनही तिनं केलं होतं.

हेही वाचा: दीपिका पदुकोणचे वडील रुग्णालयात दाखल; आई आणि बहीणसुद्धा कोव्हिड पॉझिटिव्ह

हेही वाचा: 'बिग बॉस' फेम निक्की तांबोळीच्या २९ वर्षीय भावाचं कोरोनाने निधन