पस्तीस मिनिटात रेल्वे कोल्हापूरहून मिरजेत; हे कसे शक्य ?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

गेल्या दोन वर्षांपासून या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सुरू होते. ते नुकतेच पूर्ण झाले. एक महिन्यापूर्वी विजेवरील इंजिनाने चाचणी झाली. त्यानंतर आज (बुधवारी) रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त ए. के. जैन यांनी त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांसमवेत विशेष उपकरणे बसवलेल्या निरीक्षण गाडीने चाचणी घेतली.

कोल्हापूर - मिरज ते कोल्हापूर रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणाची कामाची अंतिम चाचणी रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त ए. के. जैन यांनी केली. ही चाचणी यशस्वी झाली असून, कोल्हापुरातून निघालेली निरीक्षण गाडी केवळ 35 मिनिटांत मिरजेत पोचली. श्री. जैन यांनी मिरज कोल्हापूर मार्गावर विजेवरील इंजिनाने वाहतूक सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात मिरज कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विजेच्या इंजिनाने होणार आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सुरू होते. ते नुकतेच पूर्ण झाले. एक महिन्यापूर्वी विजेवरील इंजिनाने चाचणी झाली. त्यानंतर आज (बुधवारी) रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त ए. के. जैन यांनी त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांसमवेत विशेष उपकरणे बसवलेल्या निरीक्षण गाडीने चाचणी घेतली. या गाडीने कोठेही न थांबता कोल्हापूर ते मिरज अंतर केवळ पस्तीस मिनिटांत पार केले. त्यानंतर श्री. जैन यांनी मिरज स्थानकानजिकच्या वीज उपकेंद्राची पाहणी केली. पुणे विभागिय व्यवस्थापक रेणू शर्मा या उपस्थित होत्या. श्री. जैन यांनी श्रीमती शर्मा यांना मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गावर तातडीने वीजेवरील इंजिनाने वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले. 

हेही वाचा - पाच हजारांची लाच घेताना एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी जाळ्यात 

रेल्वे अधिकारी स्वागतासाठी थांबून

दरम्यान पथक येणार म्हणून संपूर्ण रेल्वे स्थानक एकदम चकाचक केले होते. रेल्वे अधिकारी स्वागतासाठी थांबून होते. पुणे विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक मीनल चंद्रा, वरिष्ठ ऑपरेटिंग व्यवस्थापक गौरव झा यांच्यासह इतर अधिकारी या पथकात सहभागी झाले होते. स्थानक अधीक्षक ए. आय. फर्नांडिस, पुणे विभागीय सल्लागार समितीचे शिवनाथ बियाणी यांनी स्थानाबाबतची माहिती पथकातील प्रमुख यांना दिली.  

हेही वाचा - अबब...रेणुका हिच्या 3 वर्षात 13 सरकारी नोकऱ्या 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Within 35 Minutes Train Reach Miraj From Kolhapur