

विटा : रस्त्यावर उभ्या उसाच्या ट्रॉलीला दोन दुचाकी धडकल्याने एकजण ठार झाला, तर चारजण जखमी झाले. पोलिसांनी सांगितले, की रोहन ऊर्फ अतिश नंदकुमार वायदंडे (वय २९, पारे, ता. खानापूर) असे मृताचे, तर विजय साठे, सूरज सावंत, अजित माने, अजित साळुंखे अशी जखमींची नावे आहेत. जखमी विजय साठे (वय ३०, पारे) याने विटा पोलिसांत फिर्याद दिली. अपघात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास विटा - पारे रस्त्यावर पारे हद्दीत शिवसागर मंगल कार्यालयानजीक झाला.