

Brutal Scissors Attack on Woman Leaves Her Crying Police Shocked During Investigation Into Disturbing Incident
sakal
सांगली: गेली आठ-दहा महिने ‘ती’ मानसिक आजाराने त्रस्त होती. तिच्यावर उपचारही सुरू होते. मंगळवारी दुपारी ती घर सोडून निघून जात होती. तिला जाऊबाईंनी घरी आणलं. ‘पोरीला एकटं सोडून कुठं निघालीस, ती उपाशी हाय, तिला चार घास भरव, ’ असं सांगून जाऊबाई शेतात गेल्या. तिला सनक आली अन् पोरीच्या पोटात कात्री भोसकून तिनं तिला मारून टाकलं...आज ती पोलिसांसमोर बसून फक्त टिपं गाळत होती.