
आष्टा : येथे रस्ता ओलांडताना दुचाकीने दिलेल्या धडकेतील जखमी महिला पार्वती सदाशिव माने (वय ५८, पोखले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांचा काल (ता. ११) मृत्यू झाला आहे. याबाबत आष्टा पोलिस ठाण्यात पार्वती माने यांचे भाऊ कृष्णा बाबू जानकर (वय, ६३ चव्हाणवाडी, आष्टा, ता. वाळवा) यांनी फिर्याद दिली आहे.