
सांगली : सांगली-मिरज रस्त्यावरील कर्मवीर चौकात रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू असताना भरधाव चारचाकीने धडक दिल्याने कामावरील महिला मजूर जखमी झाली. तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. शारदा शिवाजी काळे (वय ३०, कृष्णा घाट रस्ता, भीमनगर, मिरज) असे महिलेचे नाव आहे.